Dainik Maval News : वाकसई (ता. मावळ) गावच्या हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एका ढाब्यासमोर गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भरधाव मोटारीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत हुसैन शेख आणि आसीर इनामदार यांचा मृत्यू झाला, तर मोटारचालक अनिकेत गौतम बरवा हा जखमी झाला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, लोणावळा गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेत गौतम बरवा (रा. ॲलेक्स सेक्टर नं. ७, एमआयडीसी पोलिस स्टेशनसमोर, मोशी, ता. हवेली) हा मोटार (क्रमांक एमएच १२ एमबी ६५४१) चालवत होता. पहाटे ४.१२ वाजण्यापूर्वी वाकसई गावच्या हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोटार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर खड्ड्यात जाऊन पडली.
या अपघातात मोटारीमधील हुसैन शेख आणि आसीर इनामदार यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा मृत्यू झाला. चालक अनिकेत बरवा यालाही दुखापत झाली असून वाहनाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिस गोकुळ खेडकर यांनी फिर्याद दिली. अपघातास चालकाचा निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा प्रकार कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच
– मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन
– तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू
– कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी
