Dainik Maval News : उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य व सहकार क्षेत्रातील नामांकित संस्था असलेल्या ‘राजगुरुनगर सहकारी बँक लि.’ च्या १९ व्या शाखेचा भव्य शुभारंभ सोहळा सोमवारी (दि. १९) तळेगाव दाभाडे येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती सचीन अहिर, आमदार सुनील शेळके, बाबाजी काळे आदे मान्यवर उपस्थित होते.
इ.स. १९३१ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेने सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग टिकवून ठेवत ग्राहकांचा अढळ विश्वास संपादन केला आहे. तब्बल ४१,३०८ हून अधिक सभासद असलेल्या या बँकेने २६.७६ कोटींच्या निवळ नफ्याचा टप्पा पार केला आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
तळेगाव दाभाडे येथे सुरू झालेल्या या नवीन १९ व्या शाखेमुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी व नागरिक बंधू-भगिनींना अधिक सुलभ, आधुनिक व दर्जेदार बँकिंग सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार सुनील शेळके, आमदार बाबाजी काळे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, सत्यशीलराजे दाभाडे, गणेश भेगडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, बँकेचे संचालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

