रेव्येनू कायद्यान्वये जो व्यक्ती सतत 12 वर्षे एखाद्या जागेवर स्थायिक राहत असेल तर तो त्या जमिनीचा कायदेशीर मालक बनतो. परंतू या कायद्याचा विसर स्वतः माननीय कोर्टालाच पडला असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. नागपूर येथे विधानभवनावर काढण्यात आलेल्या ‘इशारा मोर्चा’ मध्ये ते बोलत होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने परिवार हे मागील 40-50 वर्षांपासून गायरान जमिनिवर अतिक्रमण करून वास्तव्य करत आहेत. परंतू कोर्टाच्या एका निर्णयामुळे त्यांच्यावर आता बेघर होण्याची वेळ आलेली आहे. या सर्वांमधे महाराष्ट्र शासन हे निव्वळ बघ्याची भुमिका घेत असून स्वतःला सामान्य कुटूंबातील सांगणाऱ्या मुख्यमत्र्यांनी जर लवकरात लवकर भुमिका घेऊन गायरान जमिनीचा प्रश्न सोडवला नाही तर, रस्ता आणि आमचं नातं खुप जूनं आहे, तेव्हा आम्ही मुख्यामत्र्यांचा रस्ता थांबवू असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
….यासाठी चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार व्हायला हवा
चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबद्दल जे काही विधान केले, त्यामधे काहीही नाविन्य नसून ती संघाची खुप अगोदरची मानसिकता आहे. चंद्रकांत पाटील यांनी यामधे संघाच्या संस्थांचे नाव न घेत त्या खोके संस्कृतीतून निर्माण झाल्याची कबुलीच दिली, त्याकरिता चंद्रकांत पाटील यांच्या जाहीर सत्कार करायला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर बोलले.
वंचित बहुजन आघाडी तर्फे इशारा मोर्चा चे आयोजन आज करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर, अशोक सोनोने, अरूंधती शिरसाठ, सविता मुंडे, डॉ निशा शेंडे, विलास वटकर, संगिता गोधनकर, शमिभा पाटील, अमित भुईगळ, डॉ रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, राजू लोखंडे, विश्रांती रामटेके, रवी शेंडे, मुरली मेश्राम, अरविंद सांदेकर, इत्यादि पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. ( gayran land dispute prakash ambedkar Vanchit Bahujan Aghadi Agitation Nagpur )
अधिक वाचा –
– ‘बेळगाव, निपाणी, बिदरसह 865 गावे महाराष्ट्राचीच’, सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव महाराष्ट्राकडून एकमताने मंजूर!
– खळबळजनक! मावळमधील ‘या’ गावात दोन गटांत तुफान हाणामारी; अनेकजण जखमी, 8 जणांना अटक
– मावळमधील दुर्गम भागातील मोरवे शाळेला शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर कुलकर्णी यांची भेट