Dainik Maval News : लोणावळा शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील वाहतूककोंडीच्या समस्येच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.२७) आमदार सुनील शेळके यांनी संपूर्ण मुख्य बाजारपेठ परिसरात होत असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवायांच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.
आमदार सुनील शेळके यांच्या समवेत लोणावळ्यातील नगरसेवक, पदाधिकारी यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेची प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच अतिक्रमण होत असलेल्या विविध ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेतला.
लोणावळा शहरातील नागरिकांना तसेच व्यापारी बांधवांना रस्ते अधिक प्रशस्त, सुरक्षित आणि सुविधायुक्त असणे आवश्यक आहे. नागरिकांची गैरसोय दूर करून वाहतुकीला शिस्त लागावी आणि शहरातील बाजारपेठेचा परिसर सुकर व्हावा, या उद्देशाने येणाऱ्या काळात योग्य नियोजन करून अतिक्रमणाच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. असे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
अतिक्रमणाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढताना बाजारपेठेचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि शहराचे सुशोभीकरण यांचा एकत्रित विचार होणार आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणाच्या समस्येवर कोणती कारवाई होणार, याकडे आता लोणावळेकरांचे लक्ष लागले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश
– पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे
– मावळ तालुक्यात अत्याधुनिक बस थांबे उभारण्यासाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांनी मानले राज्य सरकारचे आभार
