Dainik Maval News : महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजाकरिता महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली (रेव्हेन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टम) लागू करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘एक जिल्हा, एक अपील’ ही तरतूद लागू केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राज्यात महसूल विभागांतर्गत विविध स्तरांवर अर्धन्यायिक महसुली प्रकरणे प्रलंबित राहतात. अशी प्रकरणे प्रलंबित राहिल्यास संबंधित जमिनीचा विकास करणे, हस्तांतरण करणे अशा बाबींवर परिणाम होतो. पर्यायाने नागरिकांसाठीही अडचणी निर्माण होतात आणि शासनाच्या महसुलाची हानी होते, असे आढळून आले आहे. त्यामुळे अशा अर्धन्यायिक कामकाजामध्ये प्रक्रियात्मक सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्धन्यायिक प्रकरणांची सुनावणी ऑनलाइन पद्धतीने करता यावी, याकरिता महसूल न्यायालयीन दावा व्यवस्थापन प्रणाली (Revenue Court Case Management System) राबविण्यात येणार आहे.
तसेच अशा प्रकरणांमधील अनावश्यक अपीलांचे टप्पे कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. अशी अर्धन्यायिक प्रकरणे विहित वेळेत निकालात काढण्याकरिता “एक जिल्हा, एक अपील” अशी पद्धत अवलंबिली जाणार आहे. या दोन्ही बाबींसाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये तरतूद करावी लागणार आहे. यासाठी यासंबंधित विधेयकामध्ये सुधारणा करण्यास आज बैठकीत मान्यता देण्यात आली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश
– पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे
– मावळ तालुक्यात अत्याधुनिक बस थांबे उभारण्यासाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांनी मानले राज्य सरकारचे आभार
