व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, November 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यात यापुढे प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा बंधनकारक – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दुष्काळ निवारणासाठी पाणी अडविण्याबरोबरच ‘व्हीबी-जी रामजी’ योजनेतील कामांना गती

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 28, 2026
in महाराष्ट्र, देश-विदेश
bridge-cum-weir will henceforth be mandatory alongside every new bridge said Minister Chandrashekhar Bawankule

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यात यापुढे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक पुलासोबत पूलवजा बंधारा उभारून या माध्यमातून नदी-नाल्यांमध्ये किमान एक मीटर पाणी अडविणे बंधनकारक करावे, असे निर्देश महसूलमंत्री तथा दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच ‘व्हीबी-जी रामजी’ योजनेतील कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करून एकही मजूर कामाविना राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

  • महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील पीक-पाण्याची परिस्थिती, जलसाठे, पाणीपुरवठा, रोजगार, चाऱ्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, संबंधित विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सिडको, नैना तसेच विविध विकास प्राधिकरणांमार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलांनाही पूलवजा बंधाऱ्याचे निकष लागू राहतील. निधीचा स्रोत कोणताही असला तरी यापुढील पुलांची रचना पाणी अडविण्याच्या दृष्टीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जलसंपदा आणि जलसंधारण विभागांच्या तलावांमधील गाळ व माती रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी वापरण्याबाबत राज्य शासन आणि केंद्र शासनामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्याचा मसुदा तयार झाला असून नागपूर येथील अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा करार होईल. या उपक्रमामुळे तलावांचे खोलीकरण होऊन जलसाठवण क्षमता वाढण्यास मदत होईल, असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. ‘गाळमुक्त धरण’ अभियानाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि मालगुजारी तलावांसह विविध यंत्रणांच्या मालकीच्या तलावांमधील गाळ काढण्यासाठी सुधारित दर आणि मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत. काढलेला सुपीक गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. फार्मर आयडी नसल्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी महसूल आणि कृषी विभागांनी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. वनपट्टाधारक तसेच प्रत्यक्ष जमीन कसत असल्याचा पुरावा असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी देऊन त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या, मात्र आवश्यक नोंदी उपलब्ध नसलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही पाच हजार रुपयांची मदत देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. पात्रतेनुसार त्यांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफमधील मदतही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याबरोबरच वीजजोडणीअभावी रखडलेल्या योजनांना वीजजोडणी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या भागांतील नळ पाणीपुरवठा योजनांची कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतून आलेल्या मागणीनुसार चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, चारापुरवठ्यासाठी यापूर्वीचे दरही मंजूर करण्यात आले आहेत. गायरान जमिनीवर गोशाळा उभारण्यासाठी इच्छुक संस्थांना दोन ते तीन वर्षांसाठी भाडेपट्ट्याने जागा देणे तसेच ग्रामपंचायतींच्या प्रस्तावानुसार गायरान जमिनीवर दोन ते तीन एकर क्षेत्राचे छोटे तलाव उभारणे या पर्यायांवरही राज्य शासन विचार करीत असल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश
– पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे
– मावळ तालुक्यात अत्याधुनिक बस थांबे उभारण्यासाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांनी मानले राज्य सरकारचे आभार


dainik maval jahirat

Previous Post

महसूली प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी ‘एक जिल्हा – एक अपील’ तरतूद लागू होणार

Next Post

आळंदी यात्रा व विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shri Kshetra Alandi Pune

आळंदी यात्रा व विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Kshetra Alandi Pune

आळंदी यात्रा व विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

November 28, 2026
bridge-cum-weir will henceforth be mandatory alongside every new bridge said Minister Chandrashekhar Bawankule

राज्यात यापुढे प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा बंधनकारक – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

November 28, 2026
revenue-mandals-maval-taluka

महसूली प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी ‘एक जिल्हा – एक अपील’ तरतूद लागू होणार

November 28, 2026
MLA Sunil Shelke inspects anti-encroachment drive in Lonavala City

आमदार सुनील शेळके यांच्याकडून लोणावळ्यातील अतिक्रमणविरोधी कारवाईची पाहणी!

November 28, 2026
Farmers in 33 districts of maharashtra will receive free food grains in light of drought

राज्यातील ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोफत धान्य मिळणार ; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांसाठी माणशी पाच किलो धान्य

November 28, 2026
No criminal tendencies will be tolerated in Pune city or district said DCM Sunetra Pawar

पुणे शहरासह जिल्ह्यात कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार

November 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.