ट्वीटर वापरकर्त्यांना गुरुवारी सकाळी सकाळीच मोठा धक्का बसलाय, याचे कारण म्हणजे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने त्यांना त्यांच्या प्रोपाईलमधून आपोआप लॉग आउट ( Log Out ) केले आहे. त्यानंतर ‘काहीतरी चूक झाली, पण घाबरू नका – ही तुमची चूक नाही, पुन्हा प्रयत्न करा’ अशा संदेशासह पुन्हा लॉग इन करण्यास संदेश येत आहे. मात्र वापरकर्ते अद्याप लॉग इन करु शकलेले नाही. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात इलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी टेकओव्हर केल्यानंतर ट्विटर बंद ( Twitter Down ) होण्याची ही तिसरी वेळ आहे.
डाऊन डिटेक्टर या वेबसाइटनुसार दिल्ली, नागपूर, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यासह अनेक शहरांमध्ये गुरुवारी सकाळीच आउटेज नोंदवले गेले. एरर मेसेज प्ले होत असताना, वापरकर्ता अनेक वेळा रिफ्रेश करूनही लॉग इन किंवा लॉग आउट करू शकत नव्हते. डेस्कटॉप आणि मोबाईल वापरकर्ते दोन्ही ठिकाणी समान समस्यांना तोंड देत होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
डाऊन डिटेक्टर ( Downdetector ) हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो जगभरातील वेबसाइट्सचा मागोवा घेतो आणि वेबसाइट काम करत आहे की नाही याचा अंदाज देतो. या वेबसाइटवर माहितीनुसार, जगभरातील वापरकर्त्यांना सकाळी 6 नंतर ट्टीटरबाबत समस्या येऊ लागल्या. युनायटेड स्टेट्स, बर्टेन, कॅनडा आणि फ्रान्स यांचा समावेश असलेल्या इतर देशांमध्ये वापरकर्त्यांनी समस्यांना तोंड दिले.
अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात 44 अब्ज डॉलर्सच्या व्यवहारात ट्विटर विकत घेतले. तेव्हापासून, तो ट्विटर ब्लूला सशुल्क सेवा बनविण्यासह अनेक नवीन वैशिष्ट्ये आणण्यासाठी काम करत आहे. Twitter विविध वर्गवारी/लोकांसाठी अनेक रंगांमध्ये सत्यापित वैशिष्ट्य देखील आणत आहे. मात्र. इलॉन मस्कने ट्विटरला ताब्यात घेतल्यापासून मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर सर्व्हर तिसऱ्यांदा डाऊन झाला आहे. ( Twitter Down Users logged out automatically as error message greets Twitteratis )
अधिक वाचा –
– गायरान जमिनीच्या विषयावर लवकर भुमिका स्पष्ट करावी… अन्यथा मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू – प्रकाश आंबेडकर
– तुंग गावात हॅण्ड इन हॅण्ड आणि यू.एस.जी.आय संस्थांकडून ग्रीन व्हिलेज कार्यक्रम । PHOTO