पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज (शुक्रवार, 30 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिली होती. ( PM Narendra Modi Mother Heeraben Modi Passed Away )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आई हिराबेन यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी सकाळी 7 वाजून 45 मिनिटाला अहमदाबादला पोहोचले. तेथून ते थेट गांधीनगरच्या रायसण गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. रुग्णालयातच त्यांनी आईच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 30, 2022
पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री स्व.हिराबेन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
पंतप्रधान @narendramodi जी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत.ॐ शांति! pic.twitter.com/zfMjhlgMvG
— Sunil Shelke (@shelkesunilanna) December 30, 2022
मोदीजी घरी पोहोचताय अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर आईच्या पार्थिवाला खांदा देऊन पुत्र धर्म निभावला. त्यानंतर हिराबेन मोदी यांच्यावर गांधीनगर येथील स्मशानभूमीत शोककूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह त्यांच्या भावंडांनी आई हिराबेन यांना मुखाग्नी दिला. ( Heeraben Modi Mother of PM Modi Laid To Rest In Gandhinagar She passed Away At Age of 100 )
अधिक वाचा –
– फुटबॉल जगतातील तारा निखळला! महान खेळाडू पेले यांचे निधन, जगभरातील चाहत्यांवर शोककळा
– मोठी बातमी! क्रिकेटपटू रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; पाय मोडल्याची भीती