मुंबई-पुणे ( Mumbai – Pune ) द्रुतगती महामार्गावर ( Expressway ) मुंबई बाजूस किलोमीटर 36.00 च्या जवळ गुरुवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रेलरचा ( क्रमांक NL 01 AA 8987 ) ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा ट्रेलरवरील ( Trailer Accident ) ताबा सुटला आणि ट्रेलरने अज्ञात वाहनाला ठोकर दिली. यामुळे ट्रेलर रस्त्याच्या कडेला गेल्याने काही बॅरिकेट्स तोडून थांबला. ( Trailer Accident On Mumbai-Pune Expressway )
हेही वाचा – प्रियकराचा लग्नास नकार, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, लोणावळ्यातील धक्कादायक घटना
सदर अपघातात जायरहुसेन गुलबुद्दीन छोटे (वय 36, रा. मध्यप्रदेश) हा ट्रेलरचा चालक जबर जखमी होऊन गाडीमध्ये अडकून पडला होता. या घटनेची खबर मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, मृत्युंजय देवदूत आणि लोकमान्य यंत्रणेची ॲम्बुलन्स तिथे दाखल झाली. जवळपास अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर त्या जखमी चालकाला बाहेर काढण्यात यश आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून उपचारार्थ त्याला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान काही काळ बाधित झालेली ट्रॅफिक लागलीच मोकळी केली. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झालेला असल्याने पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ( Trailer Accident On Mumbai-Pune Expressway )
अधिक वाचा –
Video : आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नातून नाणे मावळातील बुधवडी गावातील अंधार दुर
धक्कादायक! पौडमधल्या प्रसिद्ध बेकरीच्या खाद्य पदार्थात आढळला टिशू पेपर, तक्रार दाखल