भारतीय जनता पार्टीचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे दीर्घ आजाारने निधन झाले आहे. आज (मंगळवार, 3 जानेवारी) सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ( Pune Pimpri Chinchwad BJP MLA Lakshman Jagtap passed away )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्या महिन्यातच भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यानंतर आज लक्ष्मण जगताप यांनी देखील अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे दोन महत्वाचे नेते गमावलेल्या भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/9YxhkbI66u
— Supriya Sule (@supriya_sule) January 3, 2023
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच 2019 ची चिंचवड विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला.
अधिक वाचा –
– माजी नगरसेवकासह 100हून अधिक कार्यकर्त्यांचा खासदार बारणेंच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
– मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय एकतर्फी नव्हता; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वाचा निकाल सविस्तर