केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 साली घेतलेल्या तडकाफडकी नोटबंदीच्या निर्णयावरुन समाजात अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावर दाखल झालेल्या सर्व याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. ( SC Rejects Petition Challenging Modi Government Demonetisation Says Decision Making Is Not Flawed )
मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयाविरोधात 2016 मध्ये विवेक शर्मा यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात 58 अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील तीन याचिकांवर सुनावणी करण्यात आली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर सोमवारी (दिनांक 2 डिसेंबर) सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने महत्वपूर्ण दिला आहे. केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्यच आहे, असा निर्णय दिला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही असेही, मत नोंदवले आहे.
सर्वोच्च न्यायालयानं नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातील सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. तसेच नोटबंदी संबंधित घेतलेला निर्णय हा एकतर्फी नव्हता असं महत्वपूर्ण मत देखील व्यक्त केले आहे.
अधिक वाचा –
– महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 : उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न
– नितीन घोटकुले यांच्या मदतनिधीतून तुंग किल्ल्यावर रोप वे, रविवारी पार पडला उद्घाटन सोहळा