तब्बल दोन वर्षांनंतर होत असलेल्या निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह आणि आनंद यंदा मावळ तालुक्यात पाहायला मिळाला. सोमवारी (5 सप्टेंबर) रोजी तालुक्यातील अनेक गावांत घरगुती गौरी आणि गणपती यांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मिरवणूकीचा जल्लोष आणि निर्बंधमुक्त सणाचा उत्साह पाहायला मिळाला.
मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात मौजे शिळींब गावात गावठाण, धनवेवाडी, शिंदेवाडी या वाड्यावस्त्यांवरील गौरी-गणपतीचे पारंपारिकपद्धतीने विसर्जन करण्यात आले. गावातील तरुणांनी डीजेच्या तालावर तर जुण्या पिढीने ढोल ताशाच्या ठेक्यावर नाचत-गात बाप्पाला आणि महालक्ष्मींना निरोप दिला. यावेळी तब्बल दोन वर्षांनी कोरोनाच्या कुठल्याही निर्बंधाशिवाय होत असलेल्या भीतीविरहीत गणेशोत्सवाचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
मावळ तालुक्यात पुर्वापार प्रथापरंपरा यांनुसार गणेशोत्सव साजरा होतो. त्यामुळे गौरी आणि गणरायाचे एकसाथच विसर्जन होते. तर हे विसर्जन गावातील ओढ्यावर आणि दोन ओढ्यांच्या संगमावरच केले जाते. गावातील प्रत्येक घरी गणपती आणि गौरी यांचे आगमन होते. त्यामुळे विसर्जनालाही संपूर्ण गाव गोळा होत असते. ( Ganpati Visarjan 2022 Maval Taluka Images)
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
आमदार शेळकेंची पवनमावळमधील गणेशमंडळांना भेट; गणरायाच्या आरतीसह ग्रामस्थांशी साधला संवाद
खासदार बारणेंची मतदारसंघातील सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेट