मावळ लोकसभा ( Maval Loksabha ) मतदारसंघाचे खासदार, संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे ( MP Shrirang Barne ) यांनी रविवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी वडगाव मधील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेटी दिल्या. वडगावमधील नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे, असे गणरायाला साकडे घातले.
यावेळी चंद्रशेखर भोसले, गुलाबराव म्हाळसकर, राजु खांडभोर, शिवसेना नेते बाळासाहेब वाल्हेकर, शरदराव हुलावळे, अंकुशराव देशमुख, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, आदींसह वडगावमधील आजी, माजी सरपंच, उपसरपंच आणि नगरसेवक तथा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक मंडळाने फटाके वाजवून खासदार श्रीरंग बारणे यांचे स्वागत केले. तसेच मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी खासदार बारणेंसोबत फोटो घेण्याचा आनंद घेतला. ( MP Shrirang Barne visited Ganapati mandals at Vadgaon )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
आमदार शेळकेंची पवनमावळमधील गणेशमंडळांना भेट; गणरायाच्या आरतीसह ग्रामस्थांशी साधला संवाद
पुढच्या वर्षी लवकर या! मावळ तालुक्यात घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन