मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रेपोली गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून भरधाव ट्रक आणि एको कारची समोरासमोर धडक झाली. यात तब्बल 9 प्रवासी ठार झाले असून एक 4 वर्षांची चिमुरडी आश्चर्यकारकरित्या बचावली असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेपोली गावाजवळ आज (गुरुवार, 19 जानेवारी) रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात इको कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. ( Breaking Fatal Accident on Mumbai Goa Highway 9 Passengers Killed Live Raigad News )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या मुंबई गोवा महामार्गाचे बांधकाम मागील कित्येक वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. तसेच सातत्याने या रस्त्यावर अपघात होत असून अद्यापही शासन प्रशासनाला जाग आलेली नाही, त्यामुळे अजून किती नागरिकांचे बळी गेल्यावर सरकार जागे होणार, असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.
अधिक वाचा –
– दुधिवरे गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम; ग्रामस्थांनी ई-श्रम कार्ड, आभा कार्ड योजनांचा घेतला लाभ
– मोठी बातमी! तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकांसह कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांचीही घोषणा