केंद्रातील एनडीएप्रणित पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराचा पुढील टप्पा लवकरच पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा होणाऱ्या प्रमुख राज्यांच्या निवडणूका, विविध राज्यांतील आघाडी सरकारे आणि एनडीएतील घटक पक्ष आदींचा मेळ साधत हा मंत्रिमंडळ विस्तार होणार अनेक इच्छुक यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यात जून 2022 मध्ये झालेल्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर भाजपासोबत राज्यात स्थापन केलेले सरकार, यामुळे केंद्रातही काही खासदारांसह मोदी सरकारला पाठींबा दिलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या म्हणजेच शिंदे गटाच्या काही खासदारांना यात मंत्रिपदाचा लाभ मिळू शकतो, असे चर्चिले जात आहे. प्राप्त माहितीनुसार शिंदे गटाला केंद्रात तीन मंत्रिपदे दिली जाण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. ( PM Narendra Modi Government Cabinet Expansion Eknath Shinde Group MP Shrirang Barne Is Likely To Get Ministerial Post )
प्राप्त माहितीनुसार, शिंदेंनी केंद्रात तीन मंत्रिपदांची मागणी केली असून यात दोन कॅबिनेट मंत्रिपदे आणि एक राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. परंतू, सध्याच्या राजकीय चर्चांनुसार शिंदे गटाला केंद्रात तीन राज्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागेल, असे दिसते. यातही शिंदे गटाचे केंद्रात असलेले 13 खासदारांपैकी अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक असून अनेकांनी त्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.
बारणेंचे पारडे जड…
जर एकनाथ शिंदे गटाला तीन मंत्रिपदे गृहित धरल्यास यापैकी एक मंत्रिपद मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाट्याला येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू खासदारांपैकी एक आहेत. तसेच, त्यांना केंद्रातील विविध समित्यांचा चांगला अनुभव असून ते सलग दोन टर्मचे खासदार आहेत. यासह मावळ लोकसभेत येणाऱ्या मतदारसंघपैकी बराचसा भाग हा कोकण-पुणे असा विभागला असल्याने बारणेंच्या मंत्रिपदाचा चांगलाच फायदा शिंदे गटाला होऊ शकतो, त्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकांसह कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांचीही घोषणा
– मोठी बातमी! गौतम चाबुकस्वार यांची शिवसेना ठाकरे गटाच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती