महाराष्ट्रात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस ( Heavy Rain ) कोसळत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातही ( Maval Taluka ) पावसाचा जोर प्रचंड असून पवना धरणातील बॅकवॉटर परिसरात असणाऱ्या अनेक गावांना या परतीच्या मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसताना दिसत आहे. शिळींब गावातील शिंदेवाडीकडे ( Shindewadi ) जाणारा अर्धा रस्ता या जोरदार पावसामुळे वाहून गेला ( Road Washed Away ) असून येथील नागरिकांना त्यामुळे जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिंदेवाडीकडे जाणाऱ्या रस्ता हा ओढ्याच्या काठाने पुढे जातो. त्यामुळे येथे सिमेंटचा रस्ता बनवण्यात आला आहे. मात्र, गेल्या पावसात हा संपूर्ण रस्ताच उखडून गेला होता. त्यानंतरही तिथे कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे आता परतीच्या पावसात हा रस्ता मुख्य पुलाच्या पुढे एकेठिकाणी वाहून गेल्याचे दिसत असून खचलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पलिकडे शिंदेवाडी वस्तीवर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून अपघात होण्याचा धोका संभवतो आहे.
येथील नागरिकांनी अनेकदा मागणी करुनही कोणत्याही प्रकारचे पाऊल प्रशासन उचलताना दिसत नाहीये. तसेच, ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही कोणतीही उपाययोजना होताना दिसत नसल्याची खंत शिळींब विकास सोसाटीचे चेअरमन सचिन शिंदे यांनी व्यक्त केली. ( Road Washed Away Due To Heavy Rains Shilimb Village Shindewadi Maval Taluka )
अधिक वाचा –
Rain Update : पुणे जिल्ह्यातील धरणे फुल्ल, पाहा सध्या कोणत्या धरणातून किती क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु
पवना धरणाबाबत महत्वाची बातमी! नागरिकांना खास आवाहन
व्हिडिओ : ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, आमदार सुनिल शेळके यांचे निषेध मोर्चात दमदार भाषण