मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील ओमकार कंपनीत एका बाथरुममध्ये अडकलेल्या उदमांजराच्या 2 पिल्लांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी सुरक्षितरित्या रेस्क्यू करुन जीवदान दिले आहे. ( Wildlife Protector Maval Sanstha Animal Friends Gave Life To Asian Palm Civet Udmanjar Cubs )
गुरुवारी (19 जानेवारी) रोजी सोमाटणे फाटा येथील ओमकार कंपनीतील एका बाथरुममध्ये उदमांजराची दोन पिल्ले अडकली होती. भेदरलेल्या अवस्थेतील ही पिल्ले पाहून तेथील कर्मचारी पवन दंदेल यांनी याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला दिली. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळचे संतोष गोपाळे, जिगर सोलंकी आणि झाकीर शेख हे वेळ न दवडता कंपनीत पोहोचले. त्यांनी पिल्लांना सुरक्षितरित्या पकडून बाहेर काढले आणि याची माहिती वडगांव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर पिल्लांची आई तिथेच बाहेर पिल्लांसाठी फिरत असताना दिसली. त्यामुळे दोन्ही पिल्लांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना आईजवळ सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी तेथील कर्मचाऱ्यांमध्ये या प्राण्यांबद्दल जनजागृती करुन पिल्लांना त्यांच्या आईजवळ सोडून दिले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना आवाहन केले की, कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत किंवा कुठे अडकलेला दिसल्यास वनविभाग (1926) किंवा (9822555004) आमच्या संस्थेला संपर्क करावा. ( Wildlife Protector Maval Sanstha Animal Friends Gave Life To Asian Palm Civet Udmanjar Cubs )
अधिक वाचा –
– जागरूक नागरिकामुळे वाचले जखमी पक्ष्याचे प्राण, करुंज गावात प्राणीमित्रांकडून लांडोरला जीवदान – पाहा व्हिडिओ
– आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेन शाळेत पवनमावळातील महिला पालकांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन
– वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाइस चेअरमनपदी भाजपाचे पंढरीनाथ भिलारे बिनविरोध