पुण्यात शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे रविवारी (22 जानेवारी) कामाकरिता ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, यासोबतच पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल च्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ( Pune Lonavala Local Train Cancelled Due To Work At Shivajinagar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रद्द होणाऱ्या गाडीचे नाव आणि वेळ
– लोणावळा ते पुणे : सकाळी 8.20, दुपारी 2.50, दु. 3.30, सायंकाळी 5.30
– पुणे ते लोणावळा : सकाळी 9.55, स. 11.17, दुपारी 3.00
– तळेगाव ते पुणे : दुपारी 4.30
– पुणे ते तळेगाव : सकाळी 8.57, दुपारी 3.42
पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्थानकात लोकलसाठी नवीन प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम सुरु असून ते अंतिम टप्यात आहे. या ठिकाणी रूळ जोडण्याबरोबरच काही तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी ब्लॉक घेतला आहे. त्यामुळेच पुणे ते तळेगाव आणि पुणे-लोणावळा आणि लोणावळा-पुणे दरम्यान धावणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा –
– धक्कादायक! बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला, लोणावळाजवळील देवघर येथील घटना
– महागावातील ढालेवाडी येथे महिलांकरिता शिवणकाम कौशल्याचे प्रशिक्षण, कोर्स पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे वाटप