मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज तालुक्यातील प्रमुख पर्यटन ठिकाणी भेट देत तेथील समस्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समजावून घेतल्या. कार्ला येथील एकविरा देवी मंदिर परिसराला भेट दिल्यानंतर त्यांनी लायन्स पॉइंट, लोणावळा आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह, भाजपचे तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, अंकुश देशमुख, सुनील हगवणे, दत्ता केदारी, विशाल हुलावळे, मिलींद बोत्रे आदी उपस्थित होते. ( Maval Taluka Tourism Development Plan Will Be Made Soon Information Given By MP Shrirang Barane )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“मावळ तालुक्यातील कार्ला, लोणावळा भागातील पर्यटनाला चालना, पर्यटकांना सोयी-सुविधा देण्यासाठी निधी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनीही निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील टायगर, लायन्स पॉइंटलाही आज भेट दिली. तिथे वनखात्याची अडीच हेक्टर जागा आहे. या जागेत पर्यटकांना आकर्षित करण्याबाबतच्या सुविधा निर्माण करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. राजमाचीला जाणारा रस्ताही वनखात्याच्या जागेतूनच जातो. ही अडीच हेक्टर जागाही वनखात्याची आहे. या जागा विकासासाठी देण्याचे वनविभागाने मान्य केले,” अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली.
हेही वाचा – एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 40 कोटींचा ‘डीपीआर’, लवकरच निविदा प्रसिद्ध होणार
तसेच, ”त्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जागा ताब्यात आल्यानंतर मावळातील पर्यटनाला चालना मिळेल. लोणावळ्यात येणा-या पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळतील. याबाबत लोणावळा नगरपरिषदेच्या अधिका-यांसोबत बुधवारी बैठक होणार आहे. अधिका-यांकडून माहिती घेवून जागा भूसंपादनासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल”, असेही खासदार बारणे यांनी सांगितले. ( Maval Taluka Tourism Development Plan Will Be Made Soon Information Given By MP Shrirang Barane )
याबरोबरच बारणे यांनी देहूरोड ते किवळे, मामुर्डीला वनखात्याच्या जागेतून जाणा-या रस्त्याची दुरावस्था झाली, त्याचीही पाहणी केली. नागरिकांना 30 फुटाचा रस्ता पाहिजे. त्याबाबतचा प्रस्ताव वनखात्याकडे पाठवला जाईल. वनखाते तत्काळ महापालिकेकडे जागा हस्तांतरित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– मावळच्या दोन तरूणांची जबरदस्त कामगिरी; तालुक्यात आढळणाऱ्या 36 जातीच्या सापांबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध, नक्की वाचा
– लोणावळा शहरात शिवसेनेकडून विविध समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती उत्साहात साजरी