चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पहिली आढावा बैठक सोमवारी (31 जानेवारी) पार पडली. या बैठकीत अनेक पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते. परंतू, या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केलेल्या एका विधानामुळे आणि भाजपावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. त्यामुळे चिंचवड विधानसभेसाठी आता पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी आजपासूनच (31 जानेवारी) नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहेत. परंतू, चिंचवड आणि कसबा या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपा आग्रही आहे. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीकडून या दोन्ही ठिकाणची निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु आहे. ( Before Death of MLA Laxman Jagtap BJP Start Election Preparations Serious Accusation of Maval NCP MLA Sunil Shelke Chinchwad Assembly By Election )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली बैठक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बालेकिल्ल्यात सोमवारी पार पडली. राष्ट्रवादीने या निवडणूकीची जबाबदारी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे बैठकीला सुनिल शेळके उपस्थित होते. यावेळी बैठकीनंतर सुनिल शेळकेंनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका करत निवडणूक लढवण्याचे कारण सांगितले.
लक्ष्मणभाऊंच्या जाण्याअगोदर भाजपाकडून निवडणूकीची तयारी….
“आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन 3 जानेवारीला झाले. मात्र भाऊ जाण्याच्या अगोदर किंवा त्यांच्या अखेरच्या दिवसांच्या कालावधीत भाजपाने निवडणूकीची तयारी सुरु केली होती. लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याच्या तीन महिने आधीपासून चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी भाजपाने सुरू केली होती. मग जर त्यांनाच संवेदनशीलता नसेल तर मग ही निवडणूक आम्ही बिनविरोध का करावी?” असा प्रश्नच सुनिल शेळकेंनी उपस्थित केला. ( Before Death of MLA Laxman Jagtap BJP Start Election Preparations Serious Accusation of Maval NCP MLA Sunil Shelke Chinchwad Assembly By Election )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– मोठी बातमी! श्री पोटोबा महाराज देवस्थान आणि श्री डोळसनाथ महाराज देवस्थान या ठिकाणांना ‘क-वर्ग’ तीर्थस्थळाचा दर्जा