केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज (बुधवार, दि 1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बडेट आहे तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना देशातील कोट्यवधी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. यापुढे आयकर दात्यांचे 7 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न हे करमुक्त असेल, अशी मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मध्यमवर्गीय जनतेसाठी ही सर्वात मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आयकर मर्यादा ही 5 लाखांवरुन थेट 7 लाखांपर्यंत करण्यात आल्याने करदात्यांना ही मोठी खुशखबर आहे.
अशी असेल नवी कर रचना :
– 3 ते 6 लाखांवर 5 टक्के कर
– 6 ते 9 लाखांवर 10 टक्के कर
– 9 ते 12 लाखांवर 15 टक्के कर
– 12 ते 15 लाखांवर 20 टक्के कर
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांची सुरुवातीला महत्वाची माहिती….
अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच, भारताच्या “अमृतकाळातलं” पहिलं अर्थसंकल्पीय भाषण असल्याचे सांगताना भारताच्या 100व्या वर्षाच्या वाटचालीकडे नेणारा हा अर्थसंकल्प असेल असे निर्मला सितारमन म्हणाल्या. तसेच, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देताना, PM आवास योजना, किसान सम्मान निधी, कोरोना लसीकरण आदींची माहिती सभागृहाला दिली. ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण, हस्तकलेच्या कलाकारांना बळ, पर्यटनाला प्रोत्साहन आणि ग्रीन ग्रोथ या चार गोष्टी अमृत काळात पुढे जाताना महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारची आदिवासी समुदायांसाठी मोठी घोषणा, देशात पीएम पीव्हीटीजी योजना राबवणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : भारतीय रेल्वेसाठी तब्बल 2.4 लाख कोटींचा निधी ते देशात 50 नवीन विमानतळे उभारणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारचे ‘मिशन सप्तर्षी’, ‘या’ सात घटकांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प, जाणून घ्या