व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

तळेगाव दाभाडे शहरातील सुमारे ५२८ घरकुलांचा समावेश असून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 25, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
dream of proper house of citizens of Talegaon Dabhade will come true MLA Sunil Shelke big success

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची माहिती समोर आली आहे. तळेगाव शहराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 2.0 (PMAY-U 2.0) अंतर्गत तळेगाव दाभाडे शहरासाठी तब्बल ११४ कोटी रुपयांची विशेष योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमुळे शहरातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून तळेगावच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.

दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या (CSMC) सहाव्या बैठकीत देशभरातील २.८८ लाख अतिरिक्त घरांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये तळेगाव दाभाडे शहरातील सुमारे ५२८ घरकुलांचा समावेश असून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेमुळे केवळ घरकुल उपलब्ध होणार नाही, तर शहराच्या पायाभूत सुविधांनाही मोठी चालना मिळणार आहे.

या माध्यमातून निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत आमदार सुनील शेळके यांनी अल्पावधीत तळेगावकरांसाठी हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे तळेगाव शहराच्या विकासात नवा अध्याय लिहिला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

पहिल्याच टप्प्यात नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठीही ही मोठी विकासाची भेट ठरली असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचे योगदान अधिक ठळकपणे अधोरेखित झाले आहे. केंद्र शासनाचे त्याचबरोबर राज्य शासनाने देखील मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त केले.

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश मिळत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 (PMAY-U 2.0) अंतर्गत मंजूर झालेल्या या योजनेत तळेगाव दाभाडे शहरातील सुमारे ५२८ घरकुलांचा समावेश असून सुमारे ११४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

शासन निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचा सर्व्हे करून दि. २६/१२/२०२५ रोजी सदर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शहरातील साधारण २५०० नागरिकांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी सद्यस्थितीत ५६८ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. सुमारे ४२० चौ. फुटांचे हे घर असणार असून हक्काचे घर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमधून समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे. तळेगावच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना विकासाचा नवा टप्पा ठरणार असून शहराच्या भविष्यातील प्रगतीला यामुळे भक्कम दिशा मिळणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– माझी वसुंधरा अभियान 5.0 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा विभागस्तरीय प्रथम क्रमांक ; 75 लाख रुपयांचे पारितोषिक
– मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांच्याकडून पदाचा राजीनामा
– सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडेतील शांताई रेसिडेन्सीतील महिलाभगिनींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

Next Post

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indrayani river pollution

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.