केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज (बुधवार, दि 1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बजेट आहे, तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.
केंद्रातील मोदी सरकारचा हा निवडणूकपूर्वीचा अर्थसंकल्प असल्याने सर्वांचेच या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते. आज (बुधवार) सकाळी राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला औपचारिक मंजूरी दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाही सितारमन यांनी डिजीटल पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गरिबांना 2024 पर्यंत मोफत रेशन –
यंदाचा अर्थसंकल्प हा सात घटकांवर आधारित असेल, असं सांगतानाच यातील पहिला घटक म्हणजेच सर्वसमावेशक विकास आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास यावर आधारित प्रमुख घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केली. अंत्योदय योजनेच्या मार्फत देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे लक्ष असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपये खर्च करत आहे आणि अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात येत आहे, अशी मोठी घोषणा केली. “आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी उपलब्ध करून देणे, विकास आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे,” असे सीतारामन म्हणाल्या. ( Poor Peoples Will Get Free Ration Till 2024 Finance Minister Nirmala Sitharaman big announcement in Union Budget 2023 )
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांची सुरुवातीला महत्वाची माहिती….
अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच, भारताच्या “अमृतकाळातलं” पहिलं अर्थसंकल्पीय भाषण असल्याचे सांगताना भारताच्या 100व्या वर्षाच्या वाटचालीकडे नेणारा हा अर्थसंकल्प असेल असे निर्मला सितारमन म्हणाल्या. तसेच, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देताना, PM आवास योजना, किसान सम्मान निधी, कोरोना लसीकरण आदींची माहिती सभागृहाला दिली. ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण, हस्तकलेच्या कलाकारांना बळ, पर्यटनाला प्रोत्साहन आणि ग्रीन ग्रोथ या चार गोष्टी अमृत काळात पुढे जाताना महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : करदात्यांसाठी मोठी खुशखबर, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारची आदिवासी समुदायांसाठी मोठी घोषणा, देशात पीएम पीव्हीटीजी योजना राबवणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारचे ‘मिशन सप्तर्षी’, ‘या’ सात घटकांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प, जाणून घ्या