राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कलम 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स एक्ट, भूसंपादन, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक, कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत. ( Organized National Lok Adalat in Pune district on 11 February 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच विविध बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था तसेच विविध ग्रामपंचायती व पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मनपा यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टीची प्रकरणे, बीएसएनएल, आयडिया-व्होडाफोन, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, आदींकडील बाकी असलेली देयके इत्यादी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता ठेवण्यात आलेली आहेत.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या मागील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 66 हजारापेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढत पुणे जिल्ह्याने राज्यात आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. लोकन्यायालयात प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांमध्ये जिंकल्याची भावना निर्माण होते तसेच दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते. जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती मंगल दीपक कश्यप यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– विधान परिषद निवडणूक : कोकणात झटका तरीही राज्यात मविआचाच डंका, भाजप पराभवाचं चिंतन करणार, पाहा सर्व निकाल
– कामशेत पोलिसांची जबरदस्त कामगिरी! गंभीर गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद, आरोपीकडून पिस्तूलासह जिवंत काडतुसे जप्त