व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट! शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज, लगेच वाचा

स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी सुरु असलेला संघर्ष आणि नाट्यमय घडामोडी यांची मालिका काही खंडित होताना दिसत नाही.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 6, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Shankar-Jagtap-Filed-Nomination-Form

Shankar Jagtap Filed Nomination Form


स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी सुरु असलेला संघर्ष आणि नाट्यमय घडामोडी यांची मालिका काही खंडित होताना दिसत नाही. शनिवार 4 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अधिकृतपणे स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी श्रीमती आश्विनी जगताप या उमेदवार असतील, असे सांगितले. तसेच उमेदवारीसाठी इच्छुक असणारे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी नाकारुन त्यांच्यावर आश्विनी जगताप यांच्या निवडणूकीची धूरा हाती देण्यात आली होती. त्यानुसार आज आश्विनी जगताप या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या. मात्र, यावेळी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज…

मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आश्विनी जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर स्वतः शंकर जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही माहिती समोर येताच कार्यकर्त्यांत मोठी खळबळ माजली आहे. मात्र, भाजपा नेत्यांनी शंकर जगताप यांचा उमेदवारी अर्ज हा डमी असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तो अर्ज दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले. ऐन वेळी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यावेळी कोणतीही गफलत होऊ नये, यासाठी आपण आज अर्ज भरला असल्याचे स्वतः शंकर जगताप यांनीही सांगितले. ( Laxman Jagtap Brother Shankar Jagtap Filed Nomination Form In Chinchwad By Election )

हेही वाचा – मोठी बातमी! चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक, भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी

यापूर्वी असा अर्ज भरलाय…

शंकर जगताप यांच्या अर्जावर प्रतिक्रिया देताना, आमदार लक्ष्मण जगताप उमेदवारी अर्ज भरत असताना देखील मी खबरदारी म्हणून अर्ज भरत होतो. अर्जाच्या छाननीच्या वेळी अनेक अर्ज नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे लक्ष्मण जगताप असा डमी अर्ज भरुन ठेवायचे. आजदेखील मी खबरदारी म्हणूनच डमी अर्ज भरून ठेवला असल्याचे शंकर जगताप यांनी सांगितले.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! महाविकासआघाडीचं ठरलं, कसब्याची जागा काँग्रेसकडे आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढणार
– श्रीक्षेत्र देहूत ‘गाथा चिंतन’ सोहळ्याचे द्वितीय सत्र संपन्न, वारकरी दर्पणचे संपादक सचिनदादा पवार यांनी सांगितला अभंगांचा भावार्थ


dainik maval jahirat

Previous Post

श्रीक्षेत्र देहूत ‘गाथा चिंतन’ सोहळ्याचे द्वितीय सत्र संपन्न, वारकरी दर्पणचे संपादक सचिनदादा पवार यांनी सांगितला अभंगांचा भावार्थ

Next Post

तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत 30 जणांवर मोक्का, जानेवारीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत 110 गुन्हेगारांवर मोक्का

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत 30 जणांवर मोक्का, जानेवारीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत 110 गुन्हेगारांवर मोक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.