स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी सुरु असलेला संघर्ष आणि नाट्यमय घडामोडी यांची मालिका काही खंडित होताना दिसत नाही. शनिवार 4 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अधिकृतपणे स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी श्रीमती आश्विनी जगताप या उमेदवार असतील, असे सांगितले. तसेच उमेदवारीसाठी इच्छुक असणारे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी नाकारुन त्यांच्यावर आश्विनी जगताप यांच्या निवडणूकीची धूरा हाती देण्यात आली होती. त्यानुसार आज आश्विनी जगताप या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या. मात्र, यावेळी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज…
मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आश्विनी जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर स्वतः शंकर जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही माहिती समोर येताच कार्यकर्त्यांत मोठी खळबळ माजली आहे. मात्र, भाजपा नेत्यांनी शंकर जगताप यांचा उमेदवारी अर्ज हा डमी असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तो अर्ज दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले. ऐन वेळी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यावेळी कोणतीही गफलत होऊ नये, यासाठी आपण आज अर्ज भरला असल्याचे स्वतः शंकर जगताप यांनीही सांगितले. ( Laxman Jagtap Brother Shankar Jagtap Filed Nomination Form In Chinchwad By Election )
हेही वाचा – मोठी बातमी! चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक, भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी
यापूर्वी असा अर्ज भरलाय…
शंकर जगताप यांच्या अर्जावर प्रतिक्रिया देताना, आमदार लक्ष्मण जगताप उमेदवारी अर्ज भरत असताना देखील मी खबरदारी म्हणून अर्ज भरत होतो. अर्जाच्या छाननीच्या वेळी अनेक अर्ज नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे लक्ष्मण जगताप असा डमी अर्ज भरुन ठेवायचे. आजदेखील मी खबरदारी म्हणूनच डमी अर्ज भरून ठेवला असल्याचे शंकर जगताप यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! महाविकासआघाडीचं ठरलं, कसब्याची जागा काँग्रेसकडे आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढणार
– श्रीक्षेत्र देहूत ‘गाथा चिंतन’ सोहळ्याचे द्वितीय सत्र संपन्न, वारकरी दर्पणचे संपादक सचिनदादा पवार यांनी सांगितला अभंगांचा भावार्थ