व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

यंदापासून प्रत्येक शाळेत 10 सप्टेंबर रोजी आजी-आजोबा दिवस साजरा होणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती

भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी- आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 6, 2023
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Grand-Father-And-Mother

File Image


भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी- आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी- आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी मंत्री केसरकर यांनी आज (सोमवार, 6 फेब्रुवारी) मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या निर्णयाची माहिती देताना केसरकर म्हणाले, 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 16 हजार रूपये, माध्यमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 18 हजार रूपये तर उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना 20 हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येईल. हे मानधन 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येत आहे. ( Grandparents Day will be celebrated in every school on September 10 Said School Education Minister Deepak Kesarkar )

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये देखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना 14 हजार रूपये, पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना 12 हजार रूपये, कनिष्ठ लिपिकास 10 हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती यांना आठ हजार रूपये मानधन मिळेल.

मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा भवन उभारले जाणार असून मराठी भाषेशी संबंधित सर्व कार्यालये या इमारतीत एकत्र असणार आहेत. त्याचप्रमाणे छोटी संमेलने आयोजित करता येतील असे सभागृह, सुसज्ज ग्रंथालय, मुंबई बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांसाठी राहण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगून इतर भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दहावी इयत्तेत अडचण निर्माण होऊ नये यासाठी पर्यावरण विषयाप्रमाणे मराठी भाषेसाठी श्रेणी देता येईल का याचा अभ्यास करण्यात येत असल्याचे मंत्री केसरकर यावेळी म्हणाले.

माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुंबईत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद या त्यांच्या जन्मगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त चेंबूर येथील 250 विद्यार्थीनी क्षमतेच्या वसतिगृहास माता रमाईंचे नाव देण्यात येणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची तसेच शाळांमधून वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अधिक वाचा –

– चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट! शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज, लगेच वाचा
– तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत 30 जणांवर मोक्का, जानेवारीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत 110 गुन्हेगारांवर मोक्का


dainik maval jahirat

Previous Post

आढले बुद्रुक येथील कर्मवीर विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Next Post

भाऊसाहेब सरदेसाई स्कूल ऑफ नर्सिंगकडून परिचारिकांचा अनोखा लॅम्प लाईटींग आणि शपथविधी सोहळा संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
swearing-in-ceremony-of-nurses

भाऊसाहेब सरदेसाई स्कूल ऑफ नर्सिंगकडून परिचारिकांचा अनोखा लॅम्प लाईटींग आणि शपथविधी सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.