फक्त मावळ तालुका ( Maval Taluka ) नाही तर संपूर्ण राज्याला हादरा देणाऱ्या कोथुर्णे बला’त्कार आणि ह’त्या प्रकरणातील ( Kothurne Rape And Murder Case ) निर्भया म्हणजेच चिमुकली स्वरा चांदेकर ( Swara Chandekar ) हिचा रविवारी ( 18 सप्टेंबर ) जन्मदिन होता. कोथुर्णे प्रकरणातील निर्भयाच्या वाढदिवसाच्या पुर्वीच नराधम आरोपीला फाशी द्यावी, या मागणीसाठी आख्खा मावळ तालुका रस्त्यावर उतरला होता, परंतू आता जन्मदिन येऊन गेला तरीही या प्रकरणातील आरोपीस फाशी झाली नसल्याने ( Accused Has Not Yet Been Hanged ) नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय.
मावळ तालुक्यातील कोथूर्णे ( Kothurne Village ) घटनेतील अत्याचारित चिमुरडी कै. कु. स्वरांजली चांदेकर ( 7 ) हीचा रविवारी ( 18 सप्टेंबर) रोजी वाढदिवस. या निमित्ताने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. तसेच समाजातील विकृत घटकांना वेळीच शिक्षा व्हावी, या उद्देशाने पिंपरी गाव येथे महिला भगिनी यांनी एकत्रित येऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्राला हादरवणारे कोथुर्णे बला’त्कार प्रकरण…
मावळ तालुक्यातील पवनानगर जवळील कोथुर्णे या छोट्याशा गावातील कु. स्वरा चांदेकर ( वय 7 वर्षे) या मुलीचे गावातील तेजस महिपती दळवी ( वय 24 ) या तरुणाने अपहरण केले होते. अपहरण करुन चिमुकलीवर लैंगिक अत्या’चार करण्यात आले. त्यानंतर सदर आरोपीने आईच्या मदतीने ( आरोपी – सुजाता महिपती दळवी ) मृतदेहाची विल्हेवाट लावत मृतदेह गावातीलच शाळेमागे फेकून दिला होता.
स्वरा बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील ग्रामस्थ, तिचे नातेवाईक आणि तक्रार दाखल केल्यानंतर कामशेत पोलिस यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, तेव्हा दुसऱ्या दिवशी चिमुकलीचा मृतदेह गावातील शाळेमागे आढळला होता. पुढे पोलिसांना 24 तासात तपास करत मुख्य आरोपी तेजस उर्फ दाद्या महिपती दळवी आणि नंतर त्याच्या आईला अटक केले होते.
या प्रकरणाने संपूर्ण मावळ तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. अनेक आक्रोश मोर्चे निघाले, तर अनेक राजकीय नेत्यांनी कोथुर्णे येथे स्वराच्या पालकांची भेट घेत मदत करण्याचे आणि आरोपींना कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान दिले होते. यात भेट कोथुर्णेत निर्भयाच्या कुटुंबीयांना भेट देणाऱ्या राजकीय नेत्यांच्या यादीत अजित पवार, चित्रा वाघ ते अगदी बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत दिग्गज नेते आले होते. मात्र, आता स्वराचा वाढदिवस येऊन गेला तरीही आरोपीस फाशीची शिक्षा झाली नाही की हे प्रकरण फास्ट कोर्टात गेले नाही. याबद्दल आता सर्वत्र खंत आणि संताप व्यक्त होतोय.
अधिक वाचा –
‘रात्री अपरात्री फोन आला तर नक्की उचला, कदाचित तो फोन मदतीसाठी हाक असेल’
लोणावळा येथे मोठी चोरी; चोरट्याकडून महागड्या वस्तूंसह रोख रक्कम लंपास, गुन्हा दाखल