वडगाव शहरात महाशिवरात्रीचे औचित्य साधून शहर परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री महादेव मंदिराच्या आवारात आज (शनिवार, 18 फेब्रुवारी) सकाळी मोरया महिला प्रतिष्ठान आणि नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मयूर ढोरेंनी स्वतः भाविकांना प्रसाद वाढला. ( Mahashivratri Mahaprasad From Morya Mahila Pratishthan Vadgaon Mayor Mayur Dhore Distributed Prasad To Devotees )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शनिवारी सकाळ पासूनच शहर आणि परिसरातील भाविक श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आणि शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी मंदिराकडे येत होते. त्यामुळे आलेल्या भाविकांसाठी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी महादेवाच्या पिंडीस नैवेद्य दाखवून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली.
साबुदाणा खिचडी, केळी आणि राजगिरा लाडू आदी फराळाचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. वडगाव परिसरातील बहुसंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्यासह यशवंत शिंदे, हर्षद ढोरे, प्रसाद साबळे, सुशिल कदम आदींनी भाविकांना प्रसादाचे वाटप केले.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात महाशिवरात्री निमित्त बहीण-भाऊ भेटीची अनोखी परंपरा
– मावळ तालुक्यातील ही प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या