मंगळवार (21 फेब्रुवारी) रोजी रात्रीच्या सुमारास जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खोपोली शहरातील ख्रिश्चन समाज स्मशानभूमी जवळ (बापदेव मंदिर) दरम्यान हा अपघात झाला. भूषण आयगल (37, रा. शास्त्रीनगर, खोपोली) असे मृत युवकाचे नाव आहे. ( Bike Rider Youth Died In An Accident On Old Mumbai Pune Highway At Khopoli )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, दुचाकीची डिव्हाईडरला धडक बसली आणि त्यानंतर दुचाकी चालक तरुणाचे डोके विजेच्या खांबावर आदळले. यामुळे अपघातग्रस्त मोटरसायकल स्वार जागीच मृत्यू पावला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खोपोली पोलीस स्टेशनच्या यंत्रणेने मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रियेसाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवला.
अधिक वाचा –
– मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तरुणाईने भीमगीतावर धरला ठेका – व्हिडिओ तुफान व्हायरल
– ‘संस्कारक्षम माणूस हा संगतीतून घडतो’, वरसुबाई माध्यमिक विद्यालयात गणेश महाराज जांभळे यांचे सुश्राव्य व्याख्यान