पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर बेगडेवाडी इथे दिनांक 26 फेब्रुवारी लोकल रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी व्यक्ती मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देहुरोड लोहमार्ग पोलिस यांच्याकडून तपास सुरु आहे. ( An unidentified person died in a collision with local train at Begdevadi Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी देहुरोड अंकीत बेगडेवाडी रे.की.मी.नं. 162/34-36 अप मध्ये एक अनोळखी पुरुष (वय अंदाजे ४० वर्ष) वर्णन – मध्यम बांधा, उंची – अंदाजे ”5-2″ इंच, रंग – काळा सावळा, नाक – बसके, हाता पायावर जळालेले जुने वर्ण हा लोकल रेल्वे गा.नं. 1574 अप या गाडीची ठोकर लागून झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत पावला.
मृताच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट त्यावर निळ्या रंगाचे ठिपके, नेसणीस खाकी रंगाची काॅटन फुल पॅन्ट, केसरी रंगाची अंडरविअर, पायात काळ्या रंगाची सॅन्डल आहे. सदर मृत पुरूष व्यक्ती बाबात काही माहीती मिळाल्यास श्रेणी पोलिस उप निरीक्षक पी. टी. करदाळे देहुरोड लोहमार्ग पोलीस मदत केंद्र सं.क्र. 9657019173 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा शहरातील रिदम हॉटेलसमोर मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन अनोळखी दुचाकीस्वारांचा मृत्यू
– घरातून निघून गेलेल्या तरुणाचा तळेगाव दाभाडे शहरातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ