मुळ इंदुरी येथील मात्र सध्या तळेगाव दाभाडे शहरात राहणारे अरुण ढोरे यांचा मुलगा अथर्व अरुण ढोरे ( वय 19 ) हा घरातून कुणालाही न सांगता दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास निघून गेला होता. मात्र, आज ( सोमवार, दिनांक 27 फेब्रुवारी) रोजी अथर्वचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. ( Youth Body Found In Talegaon Dabhade City MSEB Pond )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अथर्वच्या घराजवळ असलेल्या तलावात त्याचा मृतदेह आढळला आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी आज (27 फेब्रुवारी) रोजी सकाळच्या सुमारास तळेगाव दाभाडे शहरातील एमएसईबी तलावातून त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष निलेश संपतराव गराडे आणि सदस्य गणेश निसाळ, विशाल जव्हेरी, भास्कर माळी, कुनाल दाभाडे, श्रेयश भेगडे आदींनी रेस्क्यू दरम्यान मदत केली. तळेगाव दाभाडे पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– वृद्ध जोडप्यांना लक्ष्य करुन दरोडा टाकणारी टोळी गजाआड, पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई
– नेते हो..! तुम्ही तरी कितीवेळा चिखल तुडवत येणार, रस्त्याचं मनावर घ्या अन् पुढच्यावेळी चारचाकीत बसून मत मागायला या