स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा अभियानात देश पातळीवर मोहोर उमटवल्यानंतर पुन्हा एकदा लोणावळा नगर परिषद नव्या ध्येयासह स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानात सहभागी झाली आहे. त्या अंतर्गत नगर परिषद आणि अन्य काही संस्थांच्या माध्यमातून शहरातील विविध भागात सातत्याने स्वच्छता मोहीमा राबवल्या जात आहेत. ( Majhi Vasundhara Abhiyan Cleanliness campaign by Lonavla Nagar Parishad in Khandala Lake area )
रविवार (दिनांक 26 फेब्रुवारी) रोजी लोणावळा नगरपरिषद आणि संत निरंकारी मिशन, खंडाळा यांचे वतीने स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत खंडाळा तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने स्वसंसेवक आणि सामन्य नागरिक मोहिमेत सहभागी झाले होते. शहराला स्वच्छ लोणावळा, सुंदर लोणावळा आणि हरित लोणावळा बनवण्यासाठी ही मोहिम राबवण्यात येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– नेते हो..! तुम्ही तरी कितीवेळा चिखल तुडवत येणार, रस्त्याचं मनावर घ्या अन् पुढच्यावेळी चारचाकीत बसून मत मागायला या
– माजी विद्यार्थ्यांनी शब्द पाळला, पवना विद्या मंदिर शाळेतील सभागृह बांधणीसाठी मोठी मदतराशी शाळेकडे सुपूर्द