वाकसई – देवघर ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी महेंद्र बबन शिंदे यांची निवड झाली आहे. शुक्रवार (दिनांक 24 फेब्रुवारी) रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत महेंद्र शिंदे यांनी पुष्पा सुरेश देसाई यांचा 4 मतांनी पराभव करत बाजी मारली. ( Vakasai Group Gram Panchayat Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाकसई ग्रुप ग्रामपंचायत चे मावळते उपसरपंच कैलास काशिकर यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कालावधी पुर्ण केल्याने राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर बिनविरोध निवड व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर दिनांक 24 फेब्रुवारी रोजी वाकसई ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी विशेष बैठक बोलावण्यात आली. यावेळी महेंद्र बबन शिंदे आणि पुष्पा सुरेश देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ( Lonavla Mahendra Shinde Elected Deputy Sarpanch Of Vakasai Group Gram Panchayat )
हेही वाचा – “दुर्ग हे मावळचा खजिना… भरीव अभ्यास झाल्यास मावळातील गड किल्ल्यांमधील रहस्यमय गोष्टींचा उलगडा होईल”
अर्ज छाननीनंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याने उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये महेंद्र शिंदे यांना 8 तर पुष्पा देसाई यांना 4 मते मिळाली, त्यामुळे बहुमताने महेंद्र शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले. सरपंच दीपक काशीकर आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी अर्जुन गुडसुळकर यांच्या पिठासनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिंदे यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत त्यांची ग्रामपंचायत कार्यालय ते जेवरेवाडी पर्यंत भव्य मिरवणूक काढली.
अधिक वाचा –
– ‘चला.. पुढे या.. आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत भागीदार व्हा’, मुख्यमंत्री शिंदेंचे राज्यातील तरुणांना आवाहन, वाचा सविस्तर
– माजी विद्यार्थ्यांनी शब्द पाळला, पवना विद्या मंदिर शाळेतील सभागृह बांधणीसाठी मोठी मदतराशी शाळेकडे सुपूर्द