व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहरात अंमली पदार्थ विकणाऱ्याला रंगेहाथ अटक, तब्बल पाऊणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

तळेगाव दाभाडे शहरात बेकायदा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 6, 2023
in ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
crime-arrested

File Photo


तळेगाव दाभाडे शहरात बेकायदा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ( Man Who Brought Drugs From Rajasthan And Sold Them In Talegaon Dabhade City Arrested Red Handed By Police )

पोलिस नाईक प्रसाद मारुती कलाटे (पोलीस नाईक अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार त्यानुसार आरोपी दिनेश रामेश्वर लाल जाट (वय 25 वर्षे, सध्या रा. विद्या सहकारी गृह रचना संस्था मर्या. प्लॉट क्र 11, दत्त मंदिराचे शेजारी, शिक्षक सोसायटी तळेगाव दाभाडे, पुणे; मुळ रा. मुळ रा. सुथारिया खेड, भदेसर भादरोसा, जि चित्तोडगड राज्य राजस्थान) याच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. एक्ट कलम 8 (क), 17 (ड), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिनांक 4 मार्च रोजी दुपारी पाऊणे दोनच्या सुमारास विद्या सहकारी गृह रचना संस्था मर्या. शिक्षक सोसायटीमधील श्री दत्त महाराज मंदिर चौकाजवळ रस्त्याचे कडेला एम.एस.इ.बी. पोलचे बाजुला (ता. मावळ जि. पुणे ) इथे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद दिवशी आणि वेळेला आरोपी दिनेश रामेश्वर लाल जाट याला त्याच्या ताब्यामधील एकुण 2,74,600 रुपये किंमतीचा मुद्देमाल, ज्यामध्ये 2,05,600 रुपये किंमतीचा 514 ग्रॅम वजनाचा आफिम हा अंमली पदार्थ, तसेच 14,000 रुपये किंमतीचा मोबाईल फोन आणि 55,000 रुपये किमतीची दुचाकी यासह ताब्यात घेण्यात आले. हा अमली पदार्थ बेकायदा विक्री करण्यासाठी त्याने जवळ बाळवल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान आरोपीने त्याच्याकडे मिळून आलेला आफिम हा अंमली पदार्थ त्याच्या गावाकडील ओळखीचा दिपक सुथार (संपूर्ण नाव माहिती नाही, रा. बडीसादरी जि चित्तोडगड राज्य राजस्थान) याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. आरोपी सध्या अटकेत असून पोलिस उप निरिक्षक इंगळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –

– पत्नीची छेड काढणाऱ्या भामट्यांना जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल, 3 आरोपी अटकेत
– तळेगाव दाभाडेत ‘अरावल्ली टेरेन व्हेईकल चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धेचे आयोजन, देशभरातील विद्यार्थी सहभागी । ATVC 2023
– वडगावमध्ये पारंपारिक दगडी गोटे उचलण्याची स्पर्धा, बैठकांचा विक्रम करणाऱ्या खेळाडूला मिळणार चांदीची गदा


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमध्ये पारंपारिक दगडी गोटे उचलण्याची स्पर्धा, बैठकांचा विक्रम करणाऱ्या खेळाडूला मिळणार चांदीची गदा

Next Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट रेड झोन प्रश्नाबाबत लवकरच संरक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत संयुक्त बैठक – बाळा भेगडे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bala-Bhegade-Devendra-Fadanvis

देहूरोड कॅन्टोन्मेंट रेड झोन प्रश्नाबाबत लवकरच संरक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत संयुक्त बैठक - बाळा भेगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.