देहूरोड इथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका महिलेची तीन भामट्यांची छेड काढली, याबाबत जाब विचारायला गेलेल्या महिलेच्या पतीलाही आरोपींकडून बेदम मारहाण करण्यात आली, असा गंभीर प्रकार देहूरोड इथे घडला आहे. या प्रकरणी फिर्यादीवरुन पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ( Dehu Road Police Arrested 3 Accused Who Harassed Woman And Beat Her Husband )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 3 मार्च 2023 रोजी रात्री 9 ते पाऊणे दहाच्या सुमारास देहुरोड बंसल मेडीकल, विकासनगर समोर तसेच प्रथमेश सोसायटी, विकास नगर, देहुरोड च्या गेटवर हा प्रकार घडला. याप्रकरणी 23 वर्षीय महिला फिर्यादीने देहूरोड पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार देहूरोड पोलिस ठाण्यात
आरोपी
1) अविनाश मगन गायकवाड (वय 21 वर्षे, रा विकासनगर देहुरोड
2) साहील मनोज तरस (वय 20 वर्षे रा उत्तमनगर लेखा फार्म पाठीमागे देहुरोड)
3) आशुतोष फकीरा धुगाँव (वय 21 रा विकासनगर देहुरोड)
4 ) एक अनोळखी व्यक्ती
या आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 354 अ, 354 ड, 324, 504, 506, 427, 34 अन्वये 4 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 ते 3 अविनाश गायकवाड, साहील तरस आणि आशुतोष फकीरा धुगाँव याना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा – देहूरोड पोलिसांची जबरदस्त कामगिरी, लाखोंची लुटमार करणाऱ्या आरोपीला सिनेस्टाईलने अटक, वाचा सविस्तर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 3 मार्च रोजी फिर्यादीत नमुद गेटवर (आरोपी क्रमांक 1 ते 3) या तिघांनी दुचाकीवरून (दुचाकी नंबर समोर आलेला नाही) येऊन जोरात हॉर्न वाजवून फिर्यादी महिलेचा पाठलाग केला. तसेच फिर्यादीकडे पाहत लैंगिक शेरेबाजी करून फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न केली. याबाबत फिर्यादीचे पतींनी सदर व्यक्तींना विचारणा केली असता त्याचा राग मनात धरून तीन आरोपींनी आणि आणखीन एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी महिलेच्या पतीला डोक्यात दगड मारून जखमी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत फिर्यादीची दुचाकी (क्रमांक एम.एच. 14 डी.एल. 7174) हिचे किरकोळ नुकसाने केले. देहूरोड पोलिसचे पोलिस उप निरिक्षक थिटे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– सोमाटणे इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांचा छापा, तब्बल 1 लाखाच्या गांजासह आरोपी अटकेत
– मावळात पुढचा आमदार भाजपचाच करायचा..! मावळ विधानसभा भाजप कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात संकल्प
– धक्कादायक! मुंबईत मरीन ड्राईव्ह भागात बसण्यासाठी पोलिसाने यूपीआयद्वारे घेतली लाच, ट्वीट जोरात व्हायरल