व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात पुढचा आमदार भाजपचाच करायचा..! मावळ विधानसभा भाजप कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात संकल्प

भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग वैशाली मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 5, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval-BJP-Party-Workers

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग वैशाली मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार श्रीकांत भारतीय, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे उपस्थित होते. ( Training Class Of Bharatiya Janata Party Maval Assembly Constituency Workers At Talegaon Dabhade )

भाजपा मावळ तालुका अध्यक्ष म्हणून रविंद्र भेगडे यांनी यावेळी तालुक्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत आगामी काळात बूथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत करावयाच्या अल्प विस्तारक योजने संदर्भात सविस्तर माहिती देऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मावळ विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचाच विजयी झेंडा फडकवण्याचा संकल्प व्यक्त केला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्याचप्रमाणे शरद बट्टे पाटील यांनी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोच होतील आणि बूथ स्तरावर त्याची घरोघरी अंमलबजावणी कशा पध्दतीने करावी यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आमदार श्रीकांत भारतीय यांनी बूथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ विस्तारक यांनी बूथ स्तरावर संघटनात्मक कार्य कशा पद्धतीने वाढवता येईल, प्रत्येक बूथ वर मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम असते, यासाठी आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे याबाबत मार्गदर्शन केले. तर आभार प्रदर्शन तळेगाव शहराचे अध्यक्ष रविंद्र माने यांनी केले. या प्रशिक्षण वर्गाला मावळ विधानसभा क्षेत्रातील सर्व बूथ अध्यक्ष, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, सर्व शक्ती केंद्र विस्तारक, सर्व गण अध्यक्ष, गट अध्यक्ष, भागाचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –

– तळेगाव दाभाडेत ‘अरावल्ली टेरेन व्हेईकल चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धेचे आयोजन, देशभरातील विद्यार्थी सहभागी । ATVC 2023
– ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने लादलेला शास्तीकर युती सरकारने माफ केला, शिंदे-फडणवीसांचा भव्य नागरी सत्कार होणार’, खासदार बारणेंची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडेत ‘अरावल्ली टेरेन व्हेईकल चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धेचे आयोजन, देशभरातील विद्यार्थी सहभागी । ATVC 2023

Next Post

पत्नीची छेड काढणाऱ्या भामट्यांना जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल, 3 आरोपी अटकेत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

पत्नीची छेड काढणाऱ्या भामट्यांना जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल, 3 आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
Digital education gets boost through Device for Dreams initiative at Zilla Parishad School in Nigade Maval

मावळमधील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेत “डिव्हाईस फॉर ड्रीम्स” उपक्रमातून डिजिटल शिक्षणाला चालना !

October 3, 2026
BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.