इन्फिलीग मोटर स्पोर्ट्सतर्फे सहाव्या अरावल्ली टेरेन व्हेईकल चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथे करण्यात आले आहे.
तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजी महाविद्यालयाच्या सहकार्याने इथे ही स्पर्धा संपन्न होत आहे. स्पर्धेत संपूर्ण भारतातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टेरेन व्हेईकल तयार करुन यात सहभाग घेतला आहे. ( Aravalli Terrain Vehicle Championship 2023 Organized By InfiLeague Motor Sports At Talegaon Dabhade In Maval Taluka Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
स्पर्धेला माजी आमदार बाळा भेगडे यांनी भेट दिली. यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उद्योजक संस्थेचे खजिनदार राजेश म्हस्के, गिरीष देसाई, उद्योजक सुहास गरुड, प्राचार्य विलास देवतारे, स्पर्धेचे आयोजक, विद्यार्थी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने लादलेला शास्तीकर युती सरकारने माफ केला, शिंदे-फडणवीसांचा भव्य नागरी सत्कार होणार’, खासदार बारणेंची माहिती
– धक्कादायक! मुंबईत मरीन ड्राईव्ह भागात बसण्यासाठी पोलिसाने यूपीआयद्वारे घेतली लाच, ट्वीट जोरात व्हायरल