मुंबई मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई पोलिसातील एका अधिकाऱ्याने मरीन ड्राइव्ह भागात बसण्यासाठी 2500 रुपये लाच घेतल्याचा धक्कादायक एका व्यक्तीने केला आहे. ट्वीटद्वारे या व्यक्तीने हा आरोप केला असून यासोबतच संबंधित व्यक्तीने पोलिसाला ऑनलाईन पाठवलेल्या यूपीआय पेमेंटचा स्क्रिनशॉट देखील ट्वीट सोबत जोडला आहे. ( Man Says Police Took 2500 rs Bribe Via UPI For Sitting At Marine Drive At 2 Am Shares Pic On Tweet )
Took a bribe for sitting at Marine Drive at 2am. Is this what #Mumbai has come to?? @MumbaiPolice @mybmc pic.twitter.com/K4q16rq94M
— Viggy (@Viggyvibe) March 3, 2023
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
Anyone who accepts a bribe in digital transaction is a noob! https://t.co/ykkPXqAMVX
— Roads of Mumbai (@RoadsOfMumbai) March 4, 2023
@Viggyvibe नावाच्या अकाउंटवर हे ट्विट करण्यात आलंय. ज्यात एका व्यक्तीने हा दावा केला आहे की, मुंबईतील पोलिसांनी UPI द्वारे त्याच्याकडून 2,500 रुपये लाच घेतली आणि ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मरीन ड्राइव्ह इथे पहाटे 2 वाजता बसण्यासाठी लाच घेतली. मुंबई इथवर आलीये का??” असे त्याने म्हटले असून सोबत UPI व्यवहाराचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्याच्या ट्विटला उत्तर देताना, मुंबई पोलिसांनी घटनेचा तपास करण्यासाठी त्या व्यक्तीचा तपशील मागवला आहे.
अधिक वाचा –
– चांदखेड आणि शिवणे गावातील विकासकामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भुमिपूजन
– ‘वडगाव शहरातील ओढ्या-नाल्यांतील राडारोडा तातडीने काढा, अन्यथा…’; भाजपा महिला मोर्चा आक्रमक