सोमाटणे गावठाण इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका आरोपीला तब्बल 4 किलो गांजा या अंमली पदार्थासह अटक करण्यात आले आहे. शिरगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दोन आरोपींविरोधात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 20 ( ब ) 29 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( An Accused Arrested For Selling Ganja Illegally In Somatne Crime Registered In Shirgaon Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस शिपाई सदानंद विजय रुद्राक्षे (वय 32 वर्षे) यांनी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी 1) प्रविण रमेश शेडगे (वय 30 वर्षे रा. घर नं. 114 / ए सोमाटणे गावठाण, तळेगाव ता. मावळ जि. पुणे) आणि 2) मराठे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी प्रविण रमेश शेडगे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळ साडेचार वाजताच्या सुमारास पवना नदीच्या बाजूला तळेगाव पंप हाऊस शेजारी सोमाटणे गावठाण तळेगाव दाभाडे (ता. मावळ जि. पुणे) इथे ही कारवाई कऱण्यात आली. नमुद तारखेला सदर ठिकाणी आरोपी प्रविण रमेश शेडगे याच्या कब्जात एकुण 1,00,750 रुपये किमतीचा 4 किलो 30 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्री करिता जवळ बाळगताना मिळुन आला. तपासात आरोपी शेडगे याने सदर गांजा हा आरोपी क्रमांक 2 मराठे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक येडे हे करत आहेत.
अधिक वाचा –
– आढले खुर्द गावात मोठी घरफोडी, अज्ञात चोरट्याकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखभर रुपयांचा मुद्देमाल लंपास
– वृद्ध जोडप्यांना लक्ष्य करुन दरोडा टाकणारी टोळी गजाआड, पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई