देहूरोड येथील सिग्नल रेजीमेंट 787 एडी ब्रिगेड कंपनीचे आर्मीचे स्टेशन हेडक्वार्टर जवळ एका स्टोअर रुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामकृष्णा जनार्धनराव हडपा (वय 39 वर्षे, व्य. नोकरी, रा. अशोकनगर, बि.नं. 271/7 आर्मी क्वार्टरर्स, देहरोड, ता. हवेली. पुणे.) यांनी देहूरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार देहुरोड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा अकरा ते दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजे च्या दरम्यान सिग्नल रेजीमेंट 787 एडी ब्रिगेड कंपनीचे आर्मीचे स्टेशन हेडक्वार्टर जवळ के टी लाईन्स बिल्डींग मध्ये देहुरोड इथे हा प्रकार घडला. ( Case Registered In Dehuroad Police Against Unknown Accused For Theft Near Dehu Road Army Headquarters )
फिर्यादी रामकृष्णा जनार्धनराव हडपा यांचे सिग्नल रेजीमेंट 787 एडी ब्रिगेड कंपनीचे आर्मीचे स्टेशन हेडक्वार्टर जवळ के टी लाईन्स बिल्डींगमध्ये असलेल्या एका स्टोअर रूमचा दरवाजा जो कुलूप लावून बंद केला होता, तो तो कुणीतरी अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराने तोडून 68,500 रुपये किंमतीचे सामान चोरून नेले आहे. देहूरोड ठाण्याचे पोलिस उप निरिक्षक थिटे हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– सोमाटणे इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांचा छापा, तब्बल 1 लाखाच्या गांजासह आरोपी अटकेत
– आढले खुर्द गावात मोठी घरफोडी, अज्ञात चोरट्याकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखभर रुपयांचा मुद्देमाल लंपास