मागील काही दिवसांपासुन देहुरोड पोलीस स्टेशन परिसर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वारंवार घडणा-या जबरी चोरी, घर फोडी, वाहन चोरी, सायकल चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षाराणी पाटील यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, जबरी चोरी, वाहन चोरी, सायकल चोरी करणारे गुन्हेगारांकडे तपास करणे, क्राईम मॅपिंग नुसार चैन स्लॅनिंग चे स्पॉट वर पेट्रोलिंग करण्याचे आदेश तपास पथकास दिले होते. ( Accused Of Robbery Arrested By Dehu Road Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रेलिंग करत असताना पोलिस शिपाई सचिन शेजाळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ऋषीकेश उर्फ शेऱ्या राजु अडागळे हा साई नगर भागात पाण्याचे टाकीजवळ हातामध्ये तलवार घेऊन फिरत आहे. सदरची बातमी त्यांनी सपोनि दिगबंर अतिग्रे यांना दिली. त्यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षाराणी पाटील यांना कळवून सदर आरोपीला ताब्यात घेण्याकरिता देहुरोड पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे दोन टीम तयार करण्यात आले.
त्याप्रमाणे तपासपथकातील अंमलदार हे साई नगर भागात मिळालेल्या बातमी प्रमाणे शोध घेत असताना एकजण पोलिसांनी पाहुन पळू लागला, त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला आणि दोन्ही टीमने त्याचा पाठलाग करुन त्याला शिताफीने पकडुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे हातात एक तलवार आणि पँन्टची आत कमरेला एक कोयता मिळुन आला. सदरचे हत्यार ताब्यात घेतले आणि त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन इथे आणले. ( Accused Of Robbery Arrested By Dehu Road Police )
हेही वाचा – आर्मी हेडक्वार्टरजवळ चोरी, स्टोअर रुममधून हजारोंचा मुद्देमाल लंपास, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल
तेव्हा, त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने दौंड येथे 2 वर्षापुर्वी एका व्यापाऱ्याचे 20 लाख रुपये लुटल्याचे कबुल केले. सदर आरोपीवर देहुरोड पो.स्टे. येथे गुन्हा रजि. नं. 160/2023 भा. ह. का. कलम 4 (25) सह महा. पो. अधि. कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच सदर आरोपी याचे अभिलेख तपासता त्याच्यावर देहुरोड पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, जबरी चोरी, चोरी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हा दौंड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 610/2021 भा.द.वि.स कलम 395,120 (ब). 201 गुन्ह्यात पाहिजे आरोपी होता.
सदरची कामगीर ही पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनय चौबे, सहा. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – 2 डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, देहुरोड विभाग. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षाराणी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली देहुरोडे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, सहा. पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड, पो.हवा. प्रशांत पवार, पो.हवा. सामिल प्रकाश, पो.ना. सुनिल यादव, पो.शि. सचिन शेजाळ, पो. शि. स्वप्रिल साबळे, पो.शि. मोशिन अत्तार, पो. शि. किशोर परदेशी यांनी केला आहे.
अधिक वाचा –
– कोर्टात केस दाखल केली म्हणून हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी, गहुंजेतील धक्कादायक प्रकार
– मोठी बातमी! इंदुरी-सांगुडी रोडवर भीषण अपघात, टँकरच्या टायरखाली येऊन दुचाकीस्वार ठार, खराब रस्त्याचा आणखी एक बळी