मावळ तालुक्यात पुन्हा एकदा खराब रस्त्यामुळे एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळ इंदुरी – सांगुडी रस्त्यावर आज (2 मार्च) रोजी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ( Maval Taluka Talegaon MIDC Police Bike rider killed in an accident on Indore Sangudi Road )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
इंदुरी – सांगुडी रस्त्याची झालेली दुरावस्था ही आजवर अनेक लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरली आहे. त्यात आज एका दुचाकी आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालक थेट टँकरच्या चाकाखाली गेल्याने त्याचा चिरडून मृत्यू झाला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून मृत वाहनचालकाचे नाव अद्याप समजलेले नाही.
GJ 12 BT 5455 या टँकरच्या चाकाखाली येऊन दुचाकी चालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर, दुचाकी चालकाच्या पाठीमागे बसलेला एक व्यक्ती जखमी झाला आहे. अपघातानंतर टँकर चालक टँकर तिथेच सोडून फरार झाला आहे.
अधिक वाचा –
– कसबा पोटनिवडणूक निकाल : महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर मोठ्या मताधिक्याने विजयी, हेमंत रासने पराभूत, वाचा सविस्तर
– मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, यापुढे समितीद्वारे होणार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची निवड