मावळ तालुक्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा उपनगराध्यक्ष बनला आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत मनसेच्या सायली रूपेश म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी प्रवीण निकम आदींच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. ( MNS Sayali Mhalaskar Elected Deputy Mayor Of Vadgaon Nagar Panchayat )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळते उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी त्यांच्या पदाचा निश्चित कालावधी पूर्ण केल्याने राजीनामा दिला. त्यानंतर शुक्रवारी रिक्त पदासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांसह गटनेत्या प्रमिला बाफना, दिनेश ढोरे, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, मंगेश खैरे, शारदा ढोरे, पूजा वहिले, माया चव्हाण, पुनम जाधव, भाजपचे नगरसेवक किरण म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, सुनीता भिलारे, दीपाली मोरे आदीजण यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा – बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी! चिंचवडची जागा राखल्यानंतर ‘या’ ठिकाणी करिष्मा दाखवण्याची संधी
सायली म्हाळसकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड होताच त्यांच्या कार्यकर्ते आणि समर्थक यांनी मोठा जल्लोष केला. तसेच यावेळी माजी उपसभापती गणेश ढोरे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, सुभाषराव जाधव, तुकाराम ढोरे, सुनील ढोरे, पंढरीनाथ ढोरे, राजेश बाफना, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, विशाल वहिले, भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे आदी मान्यवरांनी सायली म्हाळसकर यांचा सत्कार केला.
सायली म्हाळसकर यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या निवडणूकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीने पाळला शब्द
वडगाव नगरपंचायतमध्ये मागील साडेचार वर्ष मनसे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी आहे. त्यानुसार राष्ट्रवादीने ठरल्याप्रमाणे मनसेला उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली.
अधिक वाचा –
– ‘डान्स मावळ डान्स’ नृत्य आणि चित्रकला स्पर्धेत मावळमधील १३०० युवा कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग
– कोर्टात केस दाखल केली म्हणून हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी, गहुंजेतील धक्कादायक प्रकार