महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने देहुरोड कॅन्टाॅनमेंट निवडणूक 2023 करिता निवडणूक प्रमुख म्हणून माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूर, गोवा त्यानंतर आता चिंचवड निवडणूकीत बाळा भेगडे यांनी त्यांच्या उत्तम नियोजनाचा करिष्मा दाखवून दिला होता. त्यामुळेच त्यांच्यावरील पक्षनेतृत्वाचा विश्वास आणखीन बळावला असून त्यामुळेच भेगडेंवर ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळा भेगडे यांच्यासह एकूण 7 जणांची राज्यातील 7 कॅन्टॉनमेंट निवडणुकीकरिता निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे. ( Bharatiya Janata Party Appoints Chief Election Leaders For Cantonment Election 2023 Sanjay Bala Bhegade For Dehu Cantonment )
कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून पक्षातील अनुभवी व तडफदार नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट निवडणूक प्रमुख म्हणून आमदार सुनीलजी कांबळे, खडकी – आमदार सिद्धार्थजी शिरोळे, देहू – संजयजी भेगडे, देवळाली – बाळासाहेब सानपजी, 1/2 pic.twitter.com/yEhEPwtg3W
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 2, 2023
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने कॅन्टॉनमेंट निवडणूक 2023 करिता निवडणूक प्रमुख पदी नियुक्त केलेल्या नेत्यांची यादी खालीलप्रमाणे;
1. पुणे कॅन्टॉनमेंट – आ. सुनिल कांबळे
2. शिवाजीनगर कॅन्टॉनमेंट – आ. सिध्दार्थ शिरोळे
3. देहू कॅन्टॉनमेंट – संजय (बाळा) भेगडे
4. देवळाली कॅन्टॉनमेंट – बाळासाहेब सानप
5. अहमदनगर कॅन्टॉनमेंट – महेंन्द्र (भैय्या) गंधे
6. औरंगाबाद कॅन्टॉनमेंट – संजय केनेकर
7. नागपूर कॅन्टॉनमेंट – राजीव पोतदार
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नांतून मावळमध्ये दहावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वाहतूक सुविधा
– मावळ तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान, तब्बल 27 टन कचरा केला गोळा