व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

PMRDA च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी ; ‘पीएमआरडीए’ने सहा महिन्यात संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री

रिंग रोड, मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, कात्रज–येरवडा ट्विन टनेल, लोणावळा स्कायवॉक प्रकल्पांना मिळणार गती

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 5, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
PMRDA budget of Rs 4 Thousand 628 crore approved PMRD should prepare structural plan said CM Fadnavis

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाने संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. तसेच येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच पीएमआरडीच्या २०२६–२०२७ च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे आदी उपस्थित होते. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कात्रज-येरवडा ट्वीन टनेलच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करावी. त्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा. तसेच पीएमआरडी व पुणे महापालिकेने संयुक्तपणे कार्यवाही करावी. तसेच पुणे महापालिकेमध्ये गेलेल्या २३ गावांचा विकास आराखडा तयार करावा. तत्पूर्वी तेथे प्रथम संरचनात्मक आराखडा तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.

‘पीएमआरडीए’च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास प्राधिकरण सभेची मान्यता
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) १४ व्या वार्षिक सभेत २०२६–२०२७ चा ₹४,६२८.८५ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला व त्यास मंजुरी देण्यात आली. नागरिकांना वेळेत आणि जलद गतीने सेवा देता यावी यासाठी जमीन विल्हेवाटीच्या दैनंदिन कामकाजाचे अधिकार थेट महानगर आयुक्तांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आला.

या अर्थसंकल्पात ₹२,९१८.८१ कोटी इतका सर्वाधिक निधी अभियांत्रिकी विभाग (१ व २) साठी पायाभूत सुविधा आणि विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पुणे महानगर क्षेत्रातील रिंग रोड, मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, कात्रज–येरवडा ट्विन टनेल, लोणावळा स्कायवॉक या कामांना गती मिळणार आहे. तसेच जमीन व मालमत्ता विभागासाठी ₹९७०.७६ कोटींचा भांडवली खर्च नियोजित करण्यात आला आहे. यंदाचा अर्थसंकल्प ₹३.५५ कोटींच्या शिलकीचा आहे.

‘पीएमआरडीए’चे २०२५–२६ चे सुधारित व २०२६–२७ चे मूळ अंदाजपत्रक या सभेत मांडण्यात आले. २०२६–२७ साठी प्राधिकरणाची एकूण महसुली व भांडवली जमा ₹४,६२८.८५ कोटी अपेक्षित आहे. याच्या तुलनेत एकूण खर्च ₹४,६२५.३० कोटी असून, अर्थसंकल्प ₹३.५५ कोटी शिलकीचा आहे. प्राधिकरणाच्या अग्निशमन निधीसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली असून, २०२६–२७ मध्ये या निधीत ₹१००.०५ कोटी जमा होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी ₹७१.०४ कोटी खर्च अपेक्षित असून ₹२९.०१ कोटी शिल्लक राहतील. प्राधिकरणाला सर्वाधिक महसूल जमीन व मालमत्ता विभागाकडून ₹१,६४७.६५ कोटी आणि विकास परवानगी विभागाकडून ₹८०५.४५ कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) ११ जून २०२१ रोजी पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण झाले होते. त्यानंतर मोकळे भूखंड, व्यापारी इमारती आणि निवासी मालमत्तांचे दायित्व पीएमआरडीएकडे आले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना विहित मुदतीत सेवा देणे आवश्यक असल्याने जमीन व मालमत्ता विभागाच्या प्रक्रियेत सुलभता आणणे गरजेचे होते. यापूर्वी नागरी सेवा प्रदान करण्याचे अंतिम अधिकार ‘विकास प्राधिकरण’ स्तरावर होते.

मात्र, ‘जमीन विल्हेवाट विनियम, २०२३’ मधील नियम क्र. २७ अन्वये अनेक अधिकार थेट महानगर आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामुळे भूखंड व गृहयोजनांचे वाटप, मालमत्तांचे हस्तांतरण, सबलीज मंजुरी, वारस नोंद, ना हरकत दाखला (एनओसी) देणे, मोकळ्या जागा तात्पुरत्या भाडेतत्त्वावर देणे, भाडेपट्ट्यानंतर ताबा देणे, फेरमोजणी करणे आदी कामे जलद गतीने होणार आहेत. तसेच ११/०६/२०२१ पासून आतापर्यंत वापरलेल्या अधिकारांना पूर्वलक्षी मान्यता देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

अर्थसंकल्पाचा तपशील :
‘पीएमआरडीए’च्या २०२६–२०२७ च्या अर्थसंकल्पात एकूण अपेक्षित जमा ₹४,६२८.८५ कोटी असून, एकूण खर्च ₹४,६२५.३० कोटी आहे. त्यामुळे ₹३.५५ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.

• महसुली जमा ₹४,४२८.३५ कोटी असून, त्यात जमीन व मालमत्ता विभागाकडून ₹१,६४७.६५ कोटी व विकास परवानगी विभागाकडून ₹८०५.४५ कोटी अपेक्षित आहेत. लेखा व वित्त विभागाकडून ₹३६०.०३ कोटी आणि इतर स्रोतांतून ₹१,६१५.२२ कोटी जमा अपेक्षित आहे.
• भांडवली जमा ₹२००.५० कोटी असून, लोणावळा स्कायवॉक प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ₹१०० कोटी व केंद्र शासनाकडून ₹१०० कोटी अपेक्षित आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून ₹५० लाख मिळण्याचा अंदाज आहे.
• खर्चाच्या बाजूस, भांडवली खर्चाला प्राधान्य देण्यात आले असून तो ₹३,८९४.६७ कोटी आहे. अभियांत्रिकी विभागासाठी ₹२,९१८.८१ कोटी, जमीन व मालमत्ता विभागासाठी ₹९७०.७६ कोटी आणि इतर विभागांसाठी ₹५.१० कोटींची तरतूद आहे.
• महसुली खर्च ₹७३०.६३ कोटी असून, त्यात आस्थापना खर्च ₹४२.१६ कोटी, कंत्राटी मानधन ₹२५.८७ कोटी, प्रशासकीय खर्च ₹२२.९५ कोटी, इतर विभागांचा खर्च ₹४३९.६५ कोटी आणि इतर संस्थांना निधी वर्ग ₹२०० कोटी आहे.
• अग्निशमन दलासाठी ₹१००.०५ कोटी जमा अपेक्षित असून, त्यापैकी ₹६२ कोटी भांडवली व ₹९.०४ कोटी महसुली खर्चासाठी नियोजित आहेत. शिल्लक ₹२९.०१ कोटी राहतील.

नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, संचालक (विकास परवानगी) अविनाश पाटील, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, तसेच दोन्ही महापालिकाच्या स्थायी समिती अध्यक्ष आदि उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील विजेची समस्या सुटणार ; पुढील २० वर्षात होणारी वाढ लक्षात घेऊन मावळ लोकसभा क्षेत्रात वीज पुरवठ्याचे नियोजन

Next Post

Kamshet Accident : कामशेत येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलावर कारला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kamshet Accident Car catches fire on flyover on old Pune-Mumbai highway One dies of burns

Kamshet Accident : कामशेत येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलावर कारला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
Potholes plague the roads in rural areas of Maval Taluka

मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य !

August 11, 2026
Potholes on Indrayani River bridge near Takve Budruk risk of accidents for both two-wheelers four-wheelers

टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.