महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सध्या मुंबईत सुरु आहे. आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी अधिवेशनाचा सातवा दिवस होता. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. तसेच, दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला. फडणवीस यांनी अर्थसंकल्प तयार करताना जनतेच्या सूचना मागवल्या होत्या, तसेच अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यामुळे अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराज यांच्या बीज दिनी त्यांना वंदन करुन देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा पाच घटकांवर म्हणजेच पंचामृतांवर आधारित असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. या पाच ध्येयातील पहिले ध्येय म्हणजेच शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी. ( Maharashtra Budget 2023 Live Updates Finance Minister Devendra Fadnavis announced Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana )
शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी या घटकाबद्दल अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात “नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना” या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेनुसार पीएम किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहे. याचाच अर्थ पीएम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला रुपये 12 हजार रुपये मिळू शकणार आहे. या योजनेसाठी सरकारकडून 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– आदिम कातकरी सेवा अभियान : दहिवली येथील आदिवासी बांधवांना आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून घरपोच जातीचे दाखले
– जागतिक महिला दिनी वडगाव शहरातील रणरागिणींचे रौद्ररुप, अवैध गावठी दारूचा कारखाना केला उध्वस्त