मावळ तालुक्यातील शिभक्तांचा आज (शुक्रवार, 10 मार्च) पहाटे अपघात झाला. मुंबई बेंगलोर मार्गावर ताथवडे जवळ रावेत इथे शिवजयंतीनिमित्त शिवज्योत घेऊन परतीच्या मार्गावर निघालेल्या या शिवभक्तांच्या टेम्पोला एका भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात सुमारे 33 जण जखमी झालेत. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांवर सध्या जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ( Shivaji Maharaj Jayanti 2023 Shiv Devotees of Shilatne Village From Maval Taluka Had An Accident At Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे माजी आमदार बाळा भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे आदींनी तातडीने संबंधित रुग्णालयात जात सर्व जखमी शिवभक्तांची भेट घेतली. अपघातात जखमी झालेले शिवभक्तांवर पवना, पायोनियर, ओजस या काही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व जखमी शिवप्रेमी तरुणांची खासदार बारणेंनी विचारपूस केली. तसेच सर्व जखमी रूग्णांची चौकशी करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून मदत करणार असल्याचे आश्वासन खासदार बारणेंनी उपस्थित नातेवाईकांना दिले.
शिवजयंती निमित्त मावळ तालुक्यातील शिलाटणे गावचे शिवप्रेमी शिवजोत घेऊन जात असतांना आज पहाटे ट्रकने ताथवडे येथे मागून येऊन धडक दिली या अपघातात तिस शिवप्रेमी तरून जखमी झाले सर्व जखमी रूग्णांची चौकशी करून वैद्यकीय केली. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @DrSEShinde pic.twitter.com/97GED8LYsr
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) March 10, 2023
प्राप्त माहितीनुसार जखमी शिवभक्त हे शिलाटणे, कुरवंडे, तिकोणा, पाटण या गावातील आहेत. तसेच अपघातात टेम्पोला धडक दिलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
अधिक वाचा –
– धक्कादायक! शिवज्योत घेऊन निघालेल्या मावळमधील शिलाटणे गावातील शिवभक्तांच्या टेम्पोचा ताथवडे इथे अपघात
– स्तुत्य उपक्रम! ओव्हळे गावात महिलांसाठी कम्युनिटी हॉलचे उद्घाटन; डोणे गावात दूध शीतकरण केंद्राचे लोकार्पण