व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आपदा मित्र आणि आपदा सखी प्रशिक्षण शिबिर; कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी ’60 मावळे तैय्यार’

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण - नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण - मुंबई आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण - रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन संदर्भात खालापूर, खोपोली, चौक, माथेरान आणि कर्जत मधील सर्वसामान्य नागरिकांसाठी 12 दिवसांचा "आपदा मित्र आणि आपदा सखी" प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 11, 2023
in महाराष्ट्र
Apada-Mitra-Apada-Sakhi-Raigad

Photo Courtesy : Gurubath Sathilkar


राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण – नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण – मुंबई आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण – रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन संदर्भात खालापूर, खोपोली, चौक, माथेरान आणि कर्जत मधील सर्वसामान्य नागरिकांसाठी 12 दिवसांचा “आपदा मित्र आणि आपदा सखी” प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.

कर्जतचे प्रांताधिकारी अजित नेराळे, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सागर पाठक, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत “आपदा मित्र आणि आपदा सखी” प्रशिक्षण कार्यक्रमाचा दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी याक एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या सभागृहात रायगड नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली आरंभ झाला. या प्रशिक्षण कालावधीत अभ्यास वर्गातून भौतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष फील्डवर नेऊन प्रशिक्षणार्थी यांना आपत्कालिन प्रसंगात कोणत्या उपाय योजना राबवाव्यात याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले गेले. या माध्यमातून आपत्कालीन प्रसंगात जीवित आणि वित्त हानी रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची विस्तृत माहिती देऊन त्यांची उजळणी करून घेण्यात आली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आपदा मित्र आणि सखींच्या खडतर प्रशिक्षण कालावधीत दीलेले धडे गिरवण्यासाठी मॉकड्रिल आणि चाचण्याही घेण्यात आल्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक आपदा मित्र आणि आपदा सखीला रुपये 15,000 बाजार मूल्य असणारे संकट समयी आवश्यक असणारे जुजबी साहित्य दिले गेले. त्याचप्रमाणे रुपये 5 लाख एवढ्या रकमेचा वैद्यकीय विमा, प्रमाणपत्र व ओळखपत्रही दिले जाणार आहे.

प्रशिक्षणाच्या समारोप समारंभात तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार, नायब तहसीलदार सुधाकर राठोड आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आसावरी पाटील या उपस्थित होत्या. या प्रशिक्षण कार्यक्रमातून तयार झालेले आपदा मित्र आणि सखी दोन्ही तालुक्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी संकट मोचन ठरतील असा विश्वास यावेळी मान्यवरांच्या प्रतिपादनातून व्यक्त करण्यात आला आणि प्रशिक्षणार्थींचे कौतुक करण्यात आले.

हेही वाचा – कान्हेफाटा जवळील श्री साईबाबा सेवाधाम इथे 12 दिवसीय ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’, मावळ-मुळशीतील 87 तरुण सहभागी

प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी याक एज्युकेशन इन्स्टिट्यूट, अल्टा लायब्रोटरिज, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, खत्री फार्म – कलोते, कॅम्प मॅक्स – कलोते, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल, महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाची देवदूत यंत्रणा, टाटा स्टील कंपनीची फायर ब्रिगेड अशा विविध संस्थांचे आणि खालापूर तालुका महसूल विभागाचे सहकार्य लाभले.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, सह्याद्री ट्रेकर्स – माथेरान, ताराराणी ब्रिगेड, यशवंती हायकर्स, आय आर बी, टाटा स्टील, विविध कंपन्या, पत्रकार आणि दोनही तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

अधिक वाचा –

– शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पात मावळमधील ‘या’ रस्त्यांना निधी; खासदार बारणेंनी मानले धन्यवाद!
– आमदार सुनिल शेळकेंनी घेतली जखमी शिवभक्तांची भेट; शिवभक्तांना आधार देत डॉक्टरांना दिल्या महत्वाच्या सुचना


dainik maval jahirat

Previous Post

शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पात मावळमधील ‘या’ रस्त्यांना निधी; खासदार बारणेंनी मानले धन्यवाद!

Next Post

मावळमधील जखमी शिवभक्तांच्या उपचारासाठी तत्काळ निधी द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संबंधित विभागाला आदेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Eknath-Shinde-Help-Injured-Shivbhakt

मावळमधील जखमी शिवभक्तांच्या उपचारासाठी तत्काळ निधी द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संबंधित विभागाला आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.