शुक्रवार (दिनांक 10 मार्च) रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त मावळ तालुक्यातील शिलाटणे गावातील काही शिवभक्त किल्ले मल्हारगड इथे शिवज्योत आणण्यासाठी गेले होते. तेव्हा परतीच्या मार्गावर असताना शुक्रवारी पहाटे त्यांच्या वाहनाला मुंबई बेंगलोर महामार्गावर रावेत ताथवडे इथे भरधाव कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या शिवभक्तांच्या रुग्णालयातील उपचार खर्चासाठी तत्काळ विशेष बाब म्हणून निधी द्यावा, असे आदेश संबंधित यंत्रणेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मल्हारगडावरुन शिवज्योत घेऊन परतीच्या मार्गावर असलेल्या शिवभक्तांपैकी 33 शिवभक्त तरुण अपघातात जखमी झालेत. अपघातानंतर त्यांना तत्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दिवसभर अनेक नेते, अधिकारी यांनी रुग्णालयात जात जखमी शिवभक्तांची भेट घेत, त्यांची विचारपूस केली. मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनीही सदर जखमींची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर भेगडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सदर जखमी शिवभक्तांच्या रुग्णालयातील उपचारासाठी आर्थिक निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली होती. ( CM Eknath Shinde Order To Provide Immediate Funds For Treatment Of Injured Shivbhakt Of Maval Taluka Shilatne Village Who Had An Accident In Pune )
हेही वाचा – आमदार सुनिल शेळकेंनी घेतली जखमी शिवभक्तांची भेट; शिवभक्तांना आधार देत डॉक्टरांना दिल्या महत्वाच्या सुचना
भेगडे यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही संबंधित यंत्रणेला तत्काळ विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. सर्व जखमी शिवभक्तांवर पायोनियर हॉस्पिटल सोमाटणे, पवना हॉस्पिटल सोमाटणे, ओजेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रावेत, पुणे येथे उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्व जखमी शिवभक्तांना उपचारासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
अधिक वाचा –
– धक्कादायक! शिवज्योत घेऊन निघालेल्या मावळमधील शिलाटणे गावातील शिवभक्तांच्या टेम्पोचा ताथवडे इथे अपघात
– जखमी शिवभक्तांची खासदार बारणे, बाळा भेगडेंनी घेतली भेट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचे आश्वासन
– आपदा मित्र आणि आपदा सखी प्रशिक्षण शिबिर; कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी ’60 मावळे तैय्यार’